🕒 1 min read
परभणी : मागच्या वर्षी पुरामुळे नुकसान झालेल्या जिंतूर तसेच सेलू येथील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने ३ कोटी ८० लाख २९ हजार ९७८ रुपयांची निधी मंजुर करण्यात आला आहे. या कामांची निविदा काढण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
मागच्या वर्षी परभणी जिल्हाभरात झालेल्या पुरामुळे तसेच अवकाळी पावसामुळे देखील रस्त्याचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे रस्त्यावरील पुलाचे देखील खुप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती पावसाळ्याअगोदर होणे गरजेचे असते, त्यामुळे जिल्हास्तरावरुन रस्ता दुरुस्तीसाठी शासनाकडे निधी मिळण्याची मागणी करण्यात आली होती. तर आता हा निधी मंजुर करण्यात आला आहे. या अंतर्गंत जिल्हाभरातील खराब झालेल्या दोन रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मिळणार आहे.
या मध्ये सेलू तालुक्यातील मोरेगाव – हातनुर – वालूर – कौसडी – बोरी – वस्सा हा रस्त्याच्या कामासाठी १ कोटी ९५ लाख ७७ हजार ३९९ रुपये मंजुर झालेले आहेत. तर जिंतूर तालुक्यामधील जिल्हा हद्द तसेच वाडी घागरा – कावी – दहेगाव या रस्त्याला १ कोटी ८४ लाख ५२ हजार ५७९ रुपयांची निधी मंजुर करण्यात आला आहे. या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा देखील काढण्यात आल्या आहेत. २६ एप्रिलपर्यंत निविदा दाखल करण्याची शेवटची तारिख होती. सोमवारपर्यंत निविदा दाखल झाल्या. या नंतर छाननी होणार आहे. त्यानंतर प्रशासकीय पद्धतीने कंत्राटदारांची निवड करुन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- हॉटेलच्या किचनमध्ये लपवलेला रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पोलिसांनी केला हस्तगत
- भाजपाच्या पुढाकारातून अंधेरी, कांदिवलीत दोन नव्या कोविड सेंटर्सचा प्रारंभ
- आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या नागरिकांनी लस पैसे देऊन घ्यावी – सचिन खरात
- होम आयसोलेशन बंद करून सक्तीचे विलगीकरण करा, मंत्री थोरात यांच्या सुचना
- ऑक्सिजन प्लांटच्या कामासाठी एका नव्या पैशाचाही निधी मिळाला नाही त्यात भ्रष्टाचार कसा झाला?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
