औरंगाबाद : अभ्यास करायचा नाही, शाळेत जायचा कंटाळा येतो, पालक रागावलेत अशा असंख्य कारणामुळे अनेक लहान मुले घर सोडून थेट रेल्वेत बसतात आणि कुठेही निघून जातात. परंतु अशावेळी त्यांना कुठे जायचे?, आपले पुढे काय होईल? याबाबत काहीच कल्पना नसते. गेल्या दिड वर्षात २९ मुले रागात घर सोडून औरंगाबादेत आली अन आरपीएफला सापडली. त्यांनी अशा मुलांना व्यवस्थित समज देऊन पालकांच्या स्वाधीन केले आहे.
चूक झाली म्हणून पालक रागवतात. काही मुलांना शाळेत जायचे नसते, अभ्यास देखील करण्याचा कंटाळा येतो. त्यामुळे आई-वडील रागावतात. रागवले म्हणून कुठलाही मागचा पुढचा विचार न करता ही मुले थेट रेल्वे स्टेशन गाठतात आणि मिळेल त्या रेल्वेत बसतात. त्यात त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. कुठे जायचे माहीत नसते. जिथपर्यंत रेल्वे जाणार आहे. तिथपर्यंत जाण्याची देखील ते मुले तयारी ठेवतात. परंतु त्यातच पालक बरोबर दिसत नाही म्हणून आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांकडून अशा मुलांची रेल्वेत चौकशी केली जाते.
त्यात आरपीएफला घर सोडून आलेली मुले रेल्वेत सापडली त्यांची चौकशी केली असता घरातून रूसून आल्याचे कारण समोर आले. मागील वर्षी १६ मुले घरातून रूसून आल्याचे आढळून आले. त्यांना आरपीएफने ताब्यात घेतले होते. तर यावर्षी जानेवारी पासून शनिवारी १० जुलैपर्यत १३ असे एकूण दिड वर्षात २९ मुले घरातून रूसून आले. त्यात उत्तरप्रदेश, महाराष्ट्रातील मुलांचा समावेश होता. अशी माहिती आरपीएफच्या वतीने देण्यात आली.
रागाच्या भरात चुकीचा निर्णय नको
आई- वडील रागविले म्हणून घर सोडणे चुकीचे आहे. पालकांनीही मुलांना समजून घेतले पाहिजे. मुलांनी देखील आई-वडील का रागावतात यामागची कारणे समजून घ्यावी. राग आला म्हणून घर सोडून थेट रेल्वेत बसून कुठेही निघून जाऊ नये. अनेक मुले रेल्वेत सापडले त्यांच्या पालकांचा शोध घेऊन त्यांची समजूत घालून पालकांच्या ताब्यात देखील सुपूर्द केले.
मात्र असे असले तरी मुलांनी घर सोडू नये. कारण काही मुले आरपीएफला, लोहमार्ग पोलिसांना सापडतात. तर काही मुले कदाचित रेल्वेने लांब देखील जातात. अनेक पालक त्यांचा शोधही घेत असतील. मात्र काही मुले सापडतही नाही. असे आवाहन आरपीएफ निरीक्षक अरविंद शर्मा यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पैठण शहरात दिशादर्शक फलक लावण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
- ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा’
- यशोमती ठाकूर यांची मध्यस्थी अन् भूमीपुत्रांवरील अन्याय दूर ; 48 तरुणांची वाचवली नोकरी
- खराब रस्त्यांची दुरुस्ती करा आणि त्यानंतर खुशाल सायकल ट्रॅक बनवा, नागरिकांची मनपाकडे मागणी!
- पुणेकरांना किंचित दिलासा : आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

