दुबई – इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेत मंगळवारी झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 5 विकेट्सने पराभव केला आणि पाचव्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकली. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्मा याने 68 धावांची अर्धशतकीय खेळी केली, तर गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट याने 3 बळी घेतले. बोल्टला या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
मुंबई इंडियन्सने तब्बल पाचव्यांदा आयपीएलच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. काल, अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय दिल्लीने घेतला. मात्र सुरुवातीलाच विकेट पटकावत दिल्लीवर अधिक दबाव निर्माण केला. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने बाजू सावरत १५६ धावांपर्यंत मजल मारली. तर, या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईने धडाकेबाज सुरुवात केली.
डी कॉकच्या विकेटनंतर यंदाच्या सत्रात चांगला सूर गवसल्यामुळे उल्लेखनीय कामगिरी करणारा सूर्यकुमार यादव मैदानात आला. मैदानात येताच त्याने चौक्याने सुरुवात केली. त्याने २० चेंडूत १९ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने एक धाव मिळवण्यासाठी पुकारल्यानंतर तो धावला मात्र नंतर खेळाडूने चेंडू अडवत लगेचच विकेटकिपरकडे थ्रो केला. त्यावेळी रोहित शर्माची विकेट न घालवता सूर्यकुमारने स्वतःला रन आऊट करून घेतलं.
सूर्यकुमारच्या या बलिदानाचे सर्वच क्रिकेटप्रेमींसह तज्ञांनी देखील कौतुक केलं. तर, विजयानंतर पत्रकारांशी बोलताना रोहित शर्माने देखील यावर भाष्य केलं. “या संपूर्ण पर्वात आमच्या बाजूने सर्व गोष्टी घडल्याअसून त्यासाठी मी आनंदी आहे. विजयाची सवय लावून घ्यायला हवी असं मी सुरुवातीपासून म्हणत आलोय. सर्व खेळाडू विश्वासातील असून आणि त्यांच्याकडून यापेक्षा अधिक मी काही मागूच शकत नाही. सूर्या ज्या फॉर्मामध्ये आहे, ते पाहता मला त्याच्यासाठी विकेट द्यायला हवी होती. त्याच्यासारखी फटकेबाजी या पर्वात कुणीच केली नाहीये.”
महत्वाच्या बातम्या
- ‘शरद पवारांनी बिहारमध्ये लक्ष घातलं असतं तर…’ ; भातखळकरांचा उपरोधिक टोला
- जेएनयू प्रांगणात होणार स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण
- ऑनलाईन न्यूज पोर्टलसह ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील केंद्र सरकार ठेवणार करडी नजर !
- आम्ही आमच्या वचनावर ठाम आहोत, नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार : भाजप
- लातूर जिल्हा परिषदेचा क्रांतिकारी निर्णय, पालकांना न सांभाळणा-या कर्मचाऱ्यांचा ३०% पगार देणार पालकांना


