🕒 1 min read
लातूर : मातापित्यांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतनातील 30% वेतन मातापित्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय लातूर जिल्हा परिषदेने घेतला आहे.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.
लातूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा दि.10 नोव्हेंबर रोजी अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेमध्ये माजी राष्ट्रपती डॉ .प्रणव मुखर्जी, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर, प्रा. अरुणाताई कांबळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
लातूर जिल्हा परिषदेमध्ये जवळपास साडेबारा हजार कर्मचारी कार्यरत असून एकूण 14 विभाग आहेत. या सर्व विभागांतर्गत कार्यरत अधिकारी-कर्मचारी हे जर आपल्या वृद्ध आई वडिलांना सांभाळत नसतील तर त्यांच्या एकूण पगाराच्या 30 % रक्कम ही संबंधितांच्या आई वडिलांच्या खात्यात जमा करावी असा ठराव आजच्या सर्वसाधारण सभेत सर्वसंमतीने पारित करण्यात आला. मंचकराव पाटील यानी ठराव माण्डला तर रामचंद्र तिरुके यानी अनुमोदन दिले .आणि जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी तोमंज़ूर केला.
समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम,सामान्य प्रशासन आदींसह विविध विभागातील विविध विषयावर चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी वृद्ध मातापित्यांच्या बाबतीत घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.लातूर जिल्हा परिषदेचा हा निर्णय क्रांतीकारी असल्याचे मत सामाजिक क्षेत्रांतून व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- नितीश कुमार यांनी भाजप आणि संघाला सोडून आमच्यासोबत यावे : कॉंग्रेस
- ‘देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमध्ये समर्पण भावनेने अपार मेहनत केली’
- शिवसेनेला मोठा झटका!, ‘हा’ नेता करणार काँग्रेसमध्ये घरवापसी
- नवी मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांनी पुकारला बंद
- नगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ ; ATM मशीन लोखंडी साखळीला बांधून पळवून नेत होते, इतक्यात…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
