Share

जेएनयू प्रांगणात होणार स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 नोव्हेंबरला संध्याकाळी 6.30 वाजता व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील स्वामी विवेकानंदांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करतील. केंद्रीय शिक्षणमंत्रीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

स्वामी विवेकानंदांचे तत्वज्ञान आणि कार्य आजही देशातील तरूण वर्गाला प्रेरणादायी आहे. विश्वातील लाखो व्यक्तींना प्रेरणा देणाऱ्या या महान व्यक्तीमत्वाबद्दल भारताला नेहमीच अभिमान वाटत आला आहे. स्वामी विवेकानंदाचे आदर्श जसे त्या काळात मार्गदर्शक ठरले तसेच ते आताही कालसुसंगत आहेत असे पंतप्रधान नेहमीच म्हणत आले आहेत.

समाजाची सेवा आणि तरुणवर्गाचे सक्षमीकरण यामुळे देशाची भौतिक, मानसिक आणि अध्यात्मिक उन्नती होते तसेच अखिल विश्वात देशाची प्रतिमा उजळते यावर पंतप्रधान नेहमीच भर देत आले आहेत. भारताची समृद्धी आणि शक्ती ही येथील लोकांमध्ये वसलेली आहे, म्हणून सर्वांच्या सक्षमीकरणाने देशाला आत्मनिर्भरता या उद्दिष्टाप्रत जाता येईल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!