मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत आणि एनडीए 125 जागांवर विजय मिळवण्यात यशस्वी झाली आहे. तर महाआघाडी 110 जागाच जिंकू शकली.’मोदी मॅजिक’ने तेजस्वी यादव यांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न भंग केले. निवडणुकीत भाजपाने 74 जागांवर विजय नोंदवला, तर जेडीयूला 43 जागा मिळाल्याने आणि राजदने 75 जगांवर विजय संपादन केला, परंतु त्यांचा मित्रपक्ष काँग्रेसला अवघ्या 19 जागा मिळाल्या.
काल संध्याकाळी जवळपास जेडीयू-भाजपचा विजय निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली. निवडणूक दोन घटकांमध्ये झाली. एकाबाजूला अनुभवी नेत्यांची फळी होती तर दुसऱ्याबाजूला तेजस्वी यादव यांचं युवा नेतृत्व. बिहारमधील बदलाला हळूहळू वाट दिसत आहे. तेजस्वी यादव लढले ते इतरांसाठी प्रेरणादायी ठरतील, असं ते म्हणाले.
तर, तेजस्वीच्या रूपानं नवं नेतृत्व तयार व्हावं यासाठी बिहारकडे लक्ष दिलं नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केल्याचा उल्लेख करत भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवारांना उपरोधिक टोला लगावला आहे. “किती हो वाईट काका… थोडं लक्ष दिलं असतं तर बिहारमध्येही तेजस्वी यादवला वडिलांना दिलेलं वचन पूर्ण करता आलं असत, कडी लावून राज्यकारभार चालवता आला असता, अग्रलेखातून, फेसबुक लाईव्ह वर तोंडाच्या वाफा सोडता आल्या असत्या… 9 किमीचा वाफांचा ढग बनवता आला असता” अशी टीका भातखळकरांनी केली आहे.
किती हो वाईट काका…
थोडं लक्ष दिलं असतं तर बिहारमध्येही तेजस्वी यादवला वडिलांना दिलेलं वचन पूर्ण करता आलं असत, कडी लावून राज्यकारभार चालवता आला असता, अग्रलेखातून, फेसबुक लाईव्ह वर तोंडाच्या वाफा सोडता आल्या असत्या… 9 किमीचा वाफांचा ढग बनवता आला असता…. pic.twitter.com/M5AW68sRrm— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 11, 2020
महत्वाच्या बातम्या
- आम्ही आमच्या वचनावर ठाम आहोत, नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार : भाजप
- बिहारच्या विजयात माझा खारीचा वाटा!, कौतुकानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
- भाजपची ‘बी टीम’ असल्याचा आरोप होणाऱ्या MIMची बिहारमध्ये जोरदार मुसंडी
- ‘नाईक कुटुंबियांबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्त केली असती तर चांगलं वाटलं असतं’
- सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे- जयंत पाटील


