🕒 1 min read
नवी दिल्ली : देशात सद्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी प्रकरणावरून वातावरण चांगलंच तापलं असून केंद्र सरकारने ऑनलाईन न्यूजसह ओटीटी प्लॅटफॉर्मबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात मनोरंजनाचे महत्वाचे साधन ठरलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्म ऑनलाइन बातम्या आणि करंट अफेअर्स संदर्भातील माहितीवर आता माहिती व प्रसारण मंत्रालयाचे लक्ष असणार आहे. यासंबंधी एका अधिसूचना जारी करून माहिती देण्यात आली आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोरोना काळात अनेक चित्रपट प्रदर्शित करण्यात आले आहेत. तर, नेटफ्लिक्स, ऍमेझॉन, ALT बालाजी यासह अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर वेब सिरीज देखील प्रदर्शित होत असतात. मात्र, अनेकवेळा त्यांच्या दृश्यांवर, कथानकावर आक्षेपांची भर पडत असून वादाला कारण बनत असल्याचं दिसून आलं होतं.
सध्या डिजिटल कटेंटवर नियंत्रण ठेवणारा कोणताही कायदा किंवा स्वायत्त संस्था नाही. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने स्वायत्त मंडळाने ओटीटी प्लॅटफॉर्मचे नियमन करावे यासंदर्भातील याचिकेवर केंद्राचा प्रतिसाद मागविला होता. त्यानंतर केंद्र सरकारनं ओटीटी प्लॅटफॉर्म आणि ऑनलाईन न्यूज पोर्टल्स माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली आणण्याचा विचार सुरू केला होता.
त्यानुसार आता, केंद्र सरकारने ऑनलाईन न्यूज पोर्टल, ऑनलाईन कंटेंट प्रोव्हायडर्स माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारित येणार आहे. त्यामुळे आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सिनेमा आणि वेबसीरिजसारखा डिजिटल ऑडिओ व्हिज्यूअल कंटेंट, त्याचप्रमाणे ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरील बातम्यांचा कंटेट देखील मंत्रालयाच्या अखत्यारित येणार आहे. त्यामुळे, या कंटेंटवर केंद्र सरकारची करडी नजर राहणार असून आक्षेपार्ह बाबींवर लक्ष ठेवण्यास मदत मिळू शकते. दुसरीकडे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म यावर काय प्रतिक्रिया देणार हे देखील महत्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या
- आम्ही आमच्या वचनावर ठाम आहोत, नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार : भाजप
- बिहारच्या विजयात माझा खारीचा वाटा!, कौतुकानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
- भाजपची ‘बी टीम’ असल्याचा आरोप होणाऱ्या MIMची बिहारमध्ये जोरदार मुसंडी
- ‘नाईक कुटुंबियांबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्त केली असती तर चांगलं वाटलं असतं’
- सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे- जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
