मुंबई : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएल २०२२ (IPL 2022) मधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. सध्या तो पत्नी रितिका सजदेहसोबत मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे. रोहितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रितिकासोबतचा फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे.
रोहितने शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने पुढील काही दिवसांसाठी सुट्ट्यांची गरज असल्याचे म्हटले आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली या मोसमात मुंबईची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. इतिहासात प्रथमच मुंबईचा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. या मोसमात मुंबईने केवळ चार सामने जिंकले आणि १० सामने गमावले. लीगच्या पूर्वार्धाच्या अखेरीस मुंबईच्या प्ले-ऑफमध्ये जाण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या होत्या. सलग पहिले आठ सामने गमावल्यानंतर मुंबईला नवव्या सामन्यात मोसमातील पहिला विजय मिळाला.
https://www.instagram.com/p/Cd8XIvqh6x3/
संघाच्या खराब कामगिरीशिवाय रोहितच्या स्वत:च्या कामगिरीवरही अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. संपूर्ण मोसमात रोहित मोठ्या धावसंख्येसाठी संघर्ष करताना दिसला. या मोसमात खेळल्या गेलेल्या १४ सामन्यांमध्ये रोहितने केवळ २६८ धावा केल्या. संपूर्ण मोसमात रोहितला एकही अर्धशतक झळकावता आले नसल्याची ही पहिलीच वेळ आहे. रोहित जूनच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या होम टी-२० मालिकेत खेळताना दिसणार नाही. त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे विश्रांतीची मागणी केली होती आणि आता तो जुलैमध्ये इंग्लंडमध्ये भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

