मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये गुजरात टायटन्स संघाने पहिल्याच हंगामात खेळून अंतिम फेरीत धडक दिली. क्वालिफायर सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सचा (GT vs RR) पराभव केला. आपल्या धमाकेदार खेळीने गुजरात टायटन्सला अंतिम फेरीत नेल्यानंतर फलंदाज डेव्हिड मिलरने राजस्थान रॉयल्सबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. याआधी मिलर राजस्थान रॉयल्सच्या संघात होता आणि आपल्या जुन्या संघाला पराभूत केल्यानंतर त्याने खास संदेश दिला आहे.
डेव्हिड मिलरने ट्वीट करून लिहिले, ”सॉरी रॉयल्स फॅमिली.” मिलर राजस्थान रॉयल्सकडून दोन हंगाम खेळला. तथापि, या काळात तो बहुतांशी बेंचवर राहिला आणि त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये क्वचितच संधी मिळाली. त्यामुळेच त्याची कामगिरी तितकीशी चांगली झाली नाही. गुजरात टायटन्समध्ये त्याला सतत संधी मिळत असून तो चांगली कामगिरीही करत आहे.
Sorry #RoyalsFamily ????♂️
— David Miller (@DavidMillerSA12) May 24, 2022
असा रंगला सामना…
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने आपल्या पहिल्याच प्रयत्नात आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रंगलेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सचा (GT vs RR) ७ गडी राखून पराभव केला. या सामन्यात हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कप्तान संजू सॅमसनच्या आक्रमक ४७ आणि जोस बटलरच्या ८८ धावांच्या जोरावर राजस्थानने गुजरातला १८९ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात गुजरातकडून डेव्हिड मिलरने फिनिशरच्या भूमिकेत खेळत गुजरातला ३ चेंडू राखून विजय मिळवून दिला. मिलरला हार्दिकची अप्रतिम साथ लाभली. शेवटच्या षटकात गुजरातला विजयासाठी १६ धावा हव्या असताना राजस्थानकडून प्रसिध कृष्णाने गोलंदाजी केली. मिलरने षटकाच्या पहिल्या तीन चेंडूवर तीन षटकार ठोकले. मिलरने ३८ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ६८ धावा केल्या. आता २९ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर म्हणजेच घरच्या मैदानावर गुजरात संघ फायनल सामना खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

