Share

Women’s T20 Challenge 2022 SNO vs VEL : हरमनप्रीत कौरचा ‘ सुपरवुमन’ अंदाज! घेतला जबरदस्त कॅच; पाहा VIDEO!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) स्पर्धेचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आलाय. आयपीएल स्पर्धेचा हा शेवटचा आठवडा असून यामध्ये ‘प्लेऑफ’ ला सुरूवात झाली आहे. आयपीएल ‘प्लेऑफ’ च्या दरम्यानच महिला क्रिकेटपटूंची टी२० चॅलेंज (Women’s T20 Challenge) स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या मंगळवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात शफाली वर्माच्या ५१ आणि लॉरा वोल्फर्डच्या नाबाद ५१ धावाच्या खेळीमुळे वेलोसिटीनं सुपपनोव्हासचा ७ गडी राखून पराभव केला आहे. सुपरनोव्हासचा या सामन्यात पराभव झाला असला तरी त्यांची कर्णधार हरमनप्रीत कौरनं (Harmanpreet Kaur) एक जबरदस्त झेल घेत शेफालीच्या खेळीचा अंत केला. हरमनचा हा झेल सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सुपरनोव्हासकडून गोलंदाजी करतांना डिंएड्रा डॉटीननं वेलोसिटीच्या इनिंगमधील १०व्या षटकांमध्ये  ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकलेल्या शॉर्ट चेंडूवर शेफालीनं जोरदार फटका लगावला. त्यावेळी हरमनप्रीत कौर शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण करत होती. तिनं अजिबात वेळ वाया न घालवता डावीकडं हवेत उडी घेतली आणि जबरदस्त झेल घेतला.

https://twitter.com/jemi_forlife/status/1529080409442914304?t=rrA4h7O17gRbyDHKYp765g&s=19

असा रंगला सामना

सुपरनोव्हासने दिलेल्या १५० धावांच्या लक्ष्यचा पाठलाग करताना वेलोसिटी संघाने १९व्या षटकात ७ गडी राखून विजय मिळवला आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. सामन्याच्या सुरुवातीला वेलोसिटी संघाची कर्णधार दीप्ती शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

वेलोसिटीचा डाव

सुपरनोव्हास संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेलोसिटीची सलामीवीर नात्थाकन चंथम लवकरच बाद झाली. यानंतर सलामीवीर शेफाली वर्माने तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या यास्तीक भाटिया सोबत धावफलक चालता ठेवला. शेफाली ने जलद अर्धशतक ठोकत ५१  धावांची तुफानी पारी खेळली. शेफाली आणि यास्तिक भाटिया बाद झाल्यानंतर लॉरा वोल्फर्ड ५१ धावा आणि कर्णधार दीप्ती शर्मा २४ धावा यांच्या महत्वपूर्ण खेळीने संघाला विजय मिळवून दिला. वेलोसिटीने १९व्या षटकातच तीन गडी गमावून १५० धावांच्या लक्ष्याचा सहज यशस्वी पाठलाग केला. सुपरनोव्हासकडून गोलंदाजी करताना डिआंड्रा डॉटिनने सर्वाधिक ४ बळी मिळवले. तर सोफी एक्लेस्टोन आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

सुपरनोव्हासचा डाव

सुपरनोव्हास संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिले तीन गडी लवकरच गमावले. मात्र त्यानंतर तानिया भाटिया (३६ धावा) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (७१ धावा) यांनी संघासाठी महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. यादरम्यान हरमनप्रीत कौरने महिला टी २० चॅलेंज स्पर्धेतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर सुन लुस हिनेही चांगली खेळी करत २० धावा केल्या व संघाची धावसंख्या १५० वर पोहोचवली. वेलोसिटी संघाकडून गोलंदाजी करताना कॅट क्रॉस तिने सर्वाधिक दोन गडी बाद केले. तर कर्णधार दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांना प्रत्येकी १-१ गडी बाद करण्यात यश आले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!