Share

IPL 2022 GT vs RR : अनलकी संजू सॅमसन..! मॅचही गमावली आणि ‘नकोसा’ विक्रमही केला नावावर; वाचा झालं काय!

Published On: 

मुंबई : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये (GT vs RR) गुजरात टायटन्सविरुद्ध नाणेफेक गमावून एक नकोसा विक्रम नोंदवला. कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात सॅमसनने महेंद्रसिंह धोनीला मागे टाकले. आयपीएलच्या या मोसमात संजूने १३व्यांदा नाणेफेक गमावली.

यापूर्वी आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनीने २०१२ मध्ये १२ वेळा नाणेफेक गमावली होती. २००८ मध्ये धोनीला ११ वेळा तर २०१३ मध्ये आरसीबीचा तत्कालीन कर्णधार विराट कोहलीला ११ वेळा टॉस गमवावा लागला होता. संजूने आयपीएल २०२२च्या १५ सामन्यांमध्ये एकूण ४२१ धावा केल्या. यादरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या ५५ ​​धावा आहे.

असा रंगला सामना…

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने आपल्या पहिल्याच प्रयत्नात आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रंगलेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सचा (GT vs RR) ७ गडी राखून पराभव केला. या सामन्यात हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कप्तान संजू सॅमसनच्या आक्रमक ४७ आणि जोस बटलरच्या ८८ धावांच्या जोरावर राजस्थानने गुजरातला १८९ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात गुजरातकडून डेव्हिड मिलरने फिनिशरच्या भूमिकेत खेळत गुजरातला ३ चेंडू राखून विजय मिळवून दिला. मिलरला हार्दिकची अप्रतिम साथ लाभली. शेवटच्या षटकात गुजरातला विजयासाठी १६ धावा हव्या असताना राजस्थानकडून प्रसिध कृष्णाने गोलंदाजी केली. मिलरने षटकाच्या पहिल्या तीन चेंडूवर तीन षटकार ठोकले. मिलरने ३८ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ६८ धावा केल्या. आता २९ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर म्हणजेच घरच्या मैदानावर गुजरात संघ फायनल सामना खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!