Share

रोहित शर्मा-रवींद्र जडेजा वनडे मालिकेसाठी संघात परतणार?

Published On: 

नवी दिल्ली : भारतीय कसोटी संघ दक्षिण आफ्रिकेत पोहोचला असून पुढील आठवड्यात वनडे संघाचीही घोषणा होऊ शकते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर टीम इंडियाला 19 जानेवारीपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा हे दोघेही कसोटी संघाचा भाग नाहीत. न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेदरम्यान जडेजाला दुखापत झाली होती.

तर दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या तयारीसाठी मुंबईत सराव करताना रोहितला दुखापत झाली होती. रोहितकडे कसोटी संघाचे उपकर्णधार, तर एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रोहित आणि जडेजा दोघेही फिटनेससाठी सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये पोहोचले आहेत.

दोघांचेही वनडे संघात पुनरागमनाचे लक्ष आहे. रोहितसाठी दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिका खूप महत्त्वाची असेल, कारण पूर्णवेळ कर्णधार म्हणून त्याची ही पहिलीच एकदिवसीय मालिका असेल. 2021 च्या टी-20 विश्वचषकानंतर रोहितकडे टी-20 संघाची कमान सोपवण्यात आली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या टी20 मालिकेत रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने 3-0 असा क्लीन स्वीप केला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!