🕒 1 min read
नवी दिल्ली : आशिया चषक 2022 मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी संघ भारत आणि पाकिस्तान यांच्यात ब्लॉकबस्टर सामना रंगणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला पाकिस्तानसोबतचा जुना हिशोब चुकता करायचा आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये दुबईच्या याच मैदानावर बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने टीम इंडियाचा १० विकेट्सने पराभव केला होता. दरम्यान सामना सुरु होण्यापूर्वी रोहित शर्मा याने पत्रकार परिषद घेतली. रोहित शर्माने संघाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान भारतीय संघाच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत त्याला प्रश्न विचारण्यात आला.
या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने संघाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान भारतीय संघाच्या पाकिस्तान दौऱ्याबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर रोहितने असे मजेशीर उत्तर दिले की सगळे हसायला लागले.
पाकिस्तान दौऱ्यावर रोहित शर्मा म्हणाला…-
रोहित शर्मा म्हणाला, “माझ्याकडे या प्रश्नाचे उत्तर असते तर मी त्याचे उत्तर दिले असते. काय करावे आणि काय करू नये हे ही मंडळे ठरवतात. हे माझ्या हातात नाही. समोर जे काही टूर्नामेंट दिसते ते खेळायला आम्ही तिथे पोहोचतो. आम्हाला जिथे पाठवले जाईल तिथे आम्ही खेळू. हा खूप अवघड प्रश्न आहे. पण बोर्डाने जिथे ठरवले तिथे आम्ही खेळू.”
आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज रविवार (28 ऑगस्ट) रोजी सामना होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. संध्याकाळी 7.30 पासून सामन्याला सुरुवात होईल. नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल.
कुठे पाहणार सामना –
सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल. तसेच Disney+Hotstar अॅपवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2022 सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.
भारताची संभाव्य प्लेइंग 11 –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (डब्ल्यूके), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.
महत्वाच्या बातम्या :
- Rohit Pawar | राकेश वाधवान मनी लॉन्डरिंग प्रकरणी रोहित पवार अडकणार ? पवार ED च्या रडारवर
- Narendra Modi | गुजरात दौऱ्या दरम्यान नरेंद्र मोदी यांनी घेतली त्यांच्या आईची भेट
- India vs Pakistan | सामन्यापूर्वीच पाक संघाला भारताचा धाक! पाकिस्तानी माजी गोलंदाजाचं मोठं वक्तव्य
- India vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज महामुकाबला! असा पाहा LIVE
- Arvind Kejriwal | अरविंद केजरीवाल यांना राज्यपाल यांच्याकडून मोठा झाटका, व्हि. के. सक्सेना यांनी ‘इतक्या’ फाईल्स परत पाठवल्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
