मुंबई: IPL 2022 स्पर्धेच्या आधी गुजरात टायटन्सने त्यांचा नवीन लोगो प्रदर्शित केला आहे. सोबतच मेटाव्हर्समध्ये लोगो लॉन्च करणारा तो पहिला भारतीय क्रीडा संघ बनला आहे. हार्दिक पंड्या, शुभमन गिल आणि आशिष नेहरा यांचे डिजिटल अवतार गुजरात टायटन्स लोगोच्या व्हिडिओ लॉन्चमध्ये एकमेकांशी बोलताना दिसले. त्यांच्या मेटा मधल्या रूपाने लोगोचे अनावरण केले. चर्चेत त्यांनी मेटाव्हर्सवर लॉन्च केलेल्या लोगोचा अर्थही सांगितलं आहे.
“आपला डीएनए नेहमी वरच्या दिशेने फिरत असतो. गुजरातचा पतंग आहे जो केवळ आमचा पॅशन नाही तर तो लार्जर दॅन लाइफ आहे. ऊर्जा आणि अमर्याद शक्ती एकत्र करणे हे आमचे ध्येय आहे. आम्ही कशावरही थांबत नाही” असे ते यावेळी म्हणाले आहे. गुजरातने त्यांचे नाव अहमदाबाद वरून गुजरात केले होते. आता त्यांनी त्यांचा लोगोही लॉन्च केला आहे.
????????♀️Step into the Titans Dugout! ▶️ Watch our stars unveil the logo in the metaverse! ⭐ ▶️ https://t.co/dCcIzWpM4U#GujaratTitans pic.twitter.com/9N6Cl6a3y4
— Gujarat Titans (@gujarat_titans) February 20, 2022
गुजरात टायटन्सने बंगळुरूमध्ये IPL 2022 मेगा ऑक्शनमध्ये काही मोठ्या निवडी करत २३ सदस्यीय संघ तयार केला आहे. त्यांनी आधीच हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून संघात घेतले होते. तसेच आशिष नेहरा संघाचे प्रशिक्षक असणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- “राऊतांनी उद्धव ठाकरेंचं घर उद्ध्वस्त करायची सुपारी घेतली”, चंद्रकांत पाटलांचे खळबळजनक विधान
- “हार्दिकला परत संघात आणू नकोस”; माजी खेळाडूचा रोहितला सल्ला
- साहाच्या खुलास्यानंतर बीसीसीआय उचलणार मोठे पाऊल!
- Breaking News : चारा घोटाळयाप्रकरणी लालू यादव यांना पाच वर्षांची शिक्षा
- भारताच्या १६ वर्षीय ग्रँडमास्टर प्रग्नानंधाकडून वर्ल्ड नं १ कार्लसन पराभूत


