Share

रोहित पवार म्हणतात, जर मला मंत्रिमंडळात संधी दिली तर मी त्याचं सोनं करेन

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : ‘जर मला मंत्रिमंडळात संधी दिली तर मी त्याचं सोनं करेन,’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. अशात मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात असताना रोहित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पवार म्हणाले की,’ मंत्रिमंडळात संधी द्यायची की नाही हा पक्षाचा निर्णय आहे. पण जर मला संधी दिली तर मी त्याचं सोनं करेन. इतरही आमदार महत्वाचे असून अपेक्षा न ठेवता मी काम करणार आहे. मी माझ्या जिल्ह्यावर अन्याय होऊ देणार नाही”, तसेच “काम करणाऱ्यांना संधी दिली पाहिजे असं लोकांना वाटत असतं. तशी जबाबदारी आपल्याला दिल्यास आपल्याला ती स्विकारावी लागेल. मी कोणत्याही पदाची अपेक्षा न करता सामाजिक आणि व्यवसायिक काम करत असतो,” असंही रोहित पवार यांनी यावेळी म्हणाले.

त्याचप्रमाणे “पक्ष कोणत्याही एका व्यक्तीचा नसून पक्षात काम करताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. “आवडण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. मात्र पार्टी व्यक्तिगत चालत नसते त्यात अनेक घटकांचा विचार केला जातो. त्यात अनेक समीकरणे असतात त्यात मला किती वाटलं मला संधी द्यावी आणि जर संधी दिली तर मी त्याच सोन करेल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!