Ravi Rana । मुंबई : मागील काही दिवसांपासून राजकीय घडामोडींमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नावाची तुफान चर्चा झाली. शिवसेनेतील आमदारांच्या बंडखोरी पासून ते राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपर्यंत संजय राऊत यांच्या नावाचाच बोलबाला सुरू होता. तर दुसरीकडे आता युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचं नाव देखील मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. हे दोघेही शिंदे गटावर आक्रमकपणे टीका करत आहेत. यांनतर आता अपक्ष आमदार रवी राणा यांनीही संजय राऊतांवर खोचक टीका केलीय.
रवी राणा म्हणाले कि, संजय राऊत हे शरद पवारांचे नंदी आहेत. राऊत यांनी सामना पेपर सांभाळला पाहिजे. राऊत पवारसाहेबांच्या हृदयात जाऊन बसले आहेत. राऊत पवारांचे पगारी नोकर झालेत. राऊत शिवसेनेचे आहेत की राष्ट्रवादीचे, असा प्रश्न पडतो. ते उद्धव ठाकरेंचं राहिलेलं अस्तित्व बुडवूनच शांत बसतील, अशा शब्दात त्यांनी संजय राऊतांवर हल्ला चढवला आहे.
दरम्यान, काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले. त्याचवेळी संजय राऊतांबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले कि, राऊतांना आता तरी समज आली पाहिजे कि त्यांनी पक्षाची काय अवस्था करून टाकलीये. त्यामुळे तुम्ही मला त्यांच्याबद्दल कशाला विचारता? एखाद्या सेन्सिबल माणसाबद्दल विचारा, असा खोचक टोला त्यांनी यावेळी राऊतांना लगावला.
महत्वाच्या बातम्या
- Anand Dave : पवार साहेब यांनी आत्ता शिवचरित्र लिहावं आणि महाराजांना न्याय द्यावा – आनंद दवे
- Sharad ponkshe | दिल्लीतल्या ५० वर्षाच्या घोड्याला गोळवलकर बोलता येईना- शरद पोंक्षे
- Amol Mitkari : दीड महिन्यापेक्षा जास्त शिंदे-फडणवीस सरकार टिकणार नाही; राष्ट्रवादीच्या या नेत्याचा मोठा दावा
- Pankaja Munde | वाढदिवसादिवशी पंकजा मुंडे होणार गायब, पहा काय कारण…
- Amol Mitkari : “विधानपरिषद निवडणुकीत एका पक्षाचे तीन आमदार २१ कोटी रुपयांमध्ये फुटले”; अमोल मिटकरींचा मोठा दावा


