Share

Ravi Rana : “शिवसेनेचे चिन्ह एकनाथ शिंदे यांनाच मिळणार, अन् शिवसेना भवनही… ”, रवी राणा यांचं मोठं भाकीत

Published On: 

Ravi Rana । मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेला धक्का दिल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. शिवसेनेतील अनेक दिग्गज नेत्यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदेंना समर्थन दिल आहे. मात्र या सर्व घडामोडी घडत असताना शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना मोठ्या प्रमाणात टार्गेट केलं आहे. तसेच बंडखोर आमदार शिवसेनेच्या आजच्या अवस्थेला राऊतांना दोषी ठरवत आहेत. या सर्व घडामोडींवर अपक्ष आमदार रवी राणा यांनी वक्तव्य करत राऊतांवर निशाणा साधला आहे.

रवी राणा म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या हातातून बाजू सुटत चालली आहे. पायाखालची वाळू सरकली आहे. बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना गमावून बसले आहेत. शिवसेनेचे चिन्ह एकनाथ शिंदे यांनाच मिळणार. शिवसेना भवन हे एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात येईल, असा दावा करत रवी राणा यांनी शिंदेंना शिवसेनेचं चिन्ह मिळणार असल्याचं भाकीत केलं आहे.

तर पुढे संजय राऊत हे शरद पवारांचे नंदी आहेत. राऊत यांनी सामना पेपर सांभाळला पाहिजे. राऊत पवारसाहेबांच्या हृदयात जाऊन बसले आहेत. राऊत पवारांचे पगारी नोकर झालेत. राऊत शिवसेनेचे आहेत की राष्ट्रवादीचे, असा प्रश्न पडतो. ते उद्धव ठाकरेंचं राहिलेलं अस्तित्व बुडवूनच शांत बसतील, रवी राणा यांनी संजय राऊतांवर हल्ला चढवला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!