🕒 1 min read
मुंबई : राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यादरम्यान, विरोधकांनी 50 खोके एकदम ओकेचा नारा लावला होता. यावरुन काल सत्ताधारी देखील आक्रमक झाले होता. अशातच आज विधान मंडळाबाहेर रोहित पवार दिसताच सत्ताधारकांनी जोरदार नारा लावला.
रोहित पवार यांच्यावर सत्ताधारकांचा निशाणाः
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा लवासा प्रकल्पामध्ये सहभाग होता. यावरुनच सत्ताधारकांनी आज रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. रोहित पवार विधान भवनात दिसताच लवासाचे खोके बारामती ओके, असा नारा सत्ताधारकांनी आज विधान भवनाच्या बाहेर पाऱ्यांवर पवारांविरुद्धध लावला.
सत्ताधारकांनी शिवसेना पक्षावरही घोषणाबाजी केली आहे. खड्ड्यांचे खोके, मोतोश्री ओके, अशी घोषणा सत्ताधारी नेत्यांनी दिली आहे. शिंदे गट आणि भाजपचे पक्षनेते आंदोलन आज विधान मंडळाच्या बाहेर करत आहेत. एवढंच नाही तर युवराजांची दिशा चुकली, असं म्हणत सत्ताधारी पक्षनेत्यांनी आदित्य ठाकरे यांना देखील लक्ष्य केलं आहे.
विधान भवनाबाहेरील राडाः
दरम्यान, 24 ऑगस्ट रोजी सत्ताधारी विरोधकांवर आक्रमक झाले आणि धक्काबुक्की झाली होती. या राड्यामुळे काल महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली होती.
दरम्यान, शिंदे गटातील 40 बंडखोर आमदारांना 50 खोक्यांची ऑफर मिळाली असल्याचं म्हटलं जात आहे. यावरुनच विरोधकांनी 50 खोके एकदम ओकेचा नारा लावून धरला आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Uddhav Thackeray | ‘खड्ड्यांचे खोके, मोतोश्री ओके’, सत्ताधारी नेत्यांचा शिवसेना पक्षावर हल्ला
- Nitin Gadkari | “राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझा हटवून कॅमेरे बसवले जाणार”, नितीन गडकरी यांची नवीन योजना
- Aditya Thackeray | युवराजांची दिशा चुकली, सत्ताधाऱ्यांचा आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा
- Ajit Pawar | पूर्वी तुम्ही डान्स बार फोडलेत, आता तुमच्या घराजवळच सुरू- अजित पवार
- Jayant Patil। “शिरसाट यांचं काय होणार? एक टोपी घेतली, दुसरीवर अन्याय का?” जयंत पाटलांची टोलेबाजी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
