🕒 1 min read
मुंबई : सध्या राज्यामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे विरोधी आणि सत्ताधारी पक्षनेत्यांमध्ये चांगलीच आरोप-प्रत्यारोपांची खेळी रंगू लागली आहे. विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर डान्स बार च्या मुद्यावरून निशाणा साधला आहे.
अजित पवार यांचा एकनाथ शिंदे यांना सवाल-
सत्तांतरानंतर विश्वासदर्शक ठरावानंतर मुख्यमंत्री या नात्याने बोलताना ठाण्यातील डान्स बार फोडले होते आणि त्यामुळे गुंडांनी लक्ष्य केले होते. केवळ आनंद दिघे यांच्यामुळे वाचलो, असं आपण म्हणाला होतात, याची आठवण अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना करून दिली. त्यावेळी डान्स बार फोडले होते. मग आता ठाण्यात तुमच्या घराच्या जवळपास मोठ्या प्रमाणावर डान्स बार सुरू आहेत. हा काय प्रकार आहे?, असा सवाल अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे. त्यावेळी त्यांनी डान्स बारची नावे ही घेतली आहेत.
राज्यासाठी लाजिरवाणी बाब-
तसेच मंत्रिमंडळामध्ये 20 लोकांना संधी दिली. पण त्या 20 लोकांमध्ये एकाही महिलेला स्थान दिले नाही. ही राज्यासाठी लाजिरवाणी बाब आहे, असल्याचं म्हणत पवारांनी शिंदे यांना चांगलच फटकारलं आहे.
पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस-
दरम्यान, काल अधिवेशनाच्या वेळी विरोधी आणि सत्ताधारी पक्षनेत्यांमध्ये धक्काबुक्की झालेली पाहायला मिळाली होती. त्यामुळे आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्यामुळे आज विधानसभेत कोणते मुद्दे बोलले जाणार आहेत, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Udhhav Thackeray | भाजप राष्ट्रीय पक्ष आहे की चोरबाजार?- उद्धव ठाकरे
- Shivsena । “अनिल पाटलांच्या गळ्यातील हार हिसकावून घेण्याचा शिंदे गटाने प्रयत्न केला, त्यावरून…”; शिवसेनेचं स्पष्टीकरण
- Atul Bhatkhalkar | तुमच्यावर बलात्काराचे आरोप झाले आणि त्याची चौकशीच झाली नाही-अतुल भातखळकर
- Shivsena । नवीन सरकारचा ट्रेलर; महाराष्ट्राला कोणता ‘पिक्चर’ दाखवणार?; शिवसेनेचा शिंदे गटावर हल्लाबोल
- Bapusaheb Gorthekar | माजी आमदार श्रीनिवास उर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे दुःखद निधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
