मुंबई : दरवर्षी प्रमाणे या वर्षीही पावसाळी अधिवेशन खूप रंगलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. काल अधिवेशनाच्या दरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये धक्काबुक्की झालेली पाहायला मिळाली होती. याच पार्श्वभूमिवर आज या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आजही नेते सडकून टोलेबाजी करतील असं दिसून येतं आहे. आता अधिवेशनाला आता सुरूवात झाली असून अशातच सत्ताधारी पक्षनेत्यांनी शिवसेना पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर घोषणाबाजी करायला सुरूवात केली आहे.
सत्ताधाऱ्यांचा आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा-
युवराजांची दिशा चुकली, असं म्हणत सत्ताधारी पक्षनेत्यांनी आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे गट आणि भाजपचे पक्षनेते आंदोलन करत आहेत. त्याठिकाणी ते महाविकास आघाडीविरोधात घोषणाबाजी करत असल्याचंही पाहायला मिळतं आहे.
सत्ताधाऱ्यांची शिवसेना पक्षावर घोषणाबाजी-
तसेच, सत्ताधारी पक्षनेते जोरदार तयारी करून आले असल्याचं दिसून येतं आहे. त्यांनी शिवसेना पक्षावरही घोषणाबाजी करायला सुरूवात केली आहे. खड्ड्यांचे खोके, मोतोश्री ओके, अशी घोषणा सत्ताधारी नेते देत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधिभवनाच्या आवारात दाखल-
दरम्यान, आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस चांगलाच रंगला जाणार असल्याचं दिसून येतं आहे. विधिभवनाच्या आवारात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले असल्याचं माहिती समोर येतं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Udhhav Thackeray | भाजप राष्ट्रीय पक्ष आहे की चोरबाजार?- उद्धव ठाकरे
- Shivsena । “अनिल पाटलांच्या गळ्यातील हार हिसकावून घेण्याचा शिंदे गटाने प्रयत्न केला, त्यावरून…”; शिवसेनेचं स्पष्टीकरण
- Atul Bhatkhalkar | तुमच्यावर बलात्काराचे आरोप झाले आणि त्याची चौकशीच झाली नाही-अतुल भातखळकर
- Shivsena । नवीन सरकारचा ट्रेलर; महाराष्ट्राला कोणता ‘पिक्चर’ दाखवणार?; शिवसेनेचा शिंदे गटावर हल्लाबोल
- Bapusaheb Gorthekar | माजी आमदार श्रीनिवास उर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे दुःखद निधन


