Share

रोहितला पराभव पचवणे अवघड; संघातील ‘या’ फलंदाजावर साधला निशाणा, म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

अबुधाबी : काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध चांगली कामगिरी केली नाही. आरसीबीने मुंबई इंडियन्सला फक्त 111 धावांवर सर्वबाद केलं. एवढेच नाही तर मुंबईची पहिली विकेट 57 धावांवर पडली, तर रोहित शर्मा स्वतः 79 धावांच्या एकूण धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर संघाने 32 धावांच्या आत सर्व विकेट गमावल्या.

आरसीबीविरुद्धचा पराभव रोहितच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. सामन्यानंतर रोहितने फलंदाजांना चांगलेच सुनावले आहे. पराभवानंतर  रोहित म्हणाला, ‘आमच्या बाजूने हा एक चांगला गोलंदाजीचा प्रयत्न होता आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. एका वेळी असे वाटले की आरसीबी180-प्लस धावा करत आहेत. या सामन्यात आमच्या फलंदाजांनी आम्हाला निराशा केली. फलंदाजान सोबत याविषयी बोलावं लागणार आहे.

हिटमॅन पुढे म्हणाला, ‘आम्ही ज्या परिस्थितीत आहोत त्यापासून मागे हटण्याची गरज आहे. आम्ही हे पूर्वीही केले आहे. फक्त या हंगामात ते घडत नाहीये. ईशान किशन बद्दल बोलताना रोहित म्हणाला, तो एक प्रतिभावान खेळाडू आहे. गेल्या वर्षीची आयपीएल त्याच्यासाठी लाजवाब होती. आम्हाला वाटते की त्याने त्याचा स्वाभाविक खेळ दाखवावा, ज्यासाठी आम्ही त्याला वरच्या फळीत सूर्यकुमार यादवच्या आधी पाठवत आहोत.

दरम्यान, आयपीएलचा सध्याचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आहे, पण हा हंगाम मुंबईसाठी विशेष राहिला नाही. मुंबईने आपले 10 साखळी सामने खेळले आहेत आणि आतापर्यंत केवळ 4 सामने जिंकले आहेत. अशाप्रकारे, मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे, परंतु पुढील प्रवास खूप कठीण आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!