Share

सिल्लोड तालुक्यातील ग्रामीण भागात होणार रस्त्यांचे जाळे; साडेतेरा कोटींचा विशेष निधी मंजूर!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार(Abdul sattar) यांच्या पाठपुराव्याने तालुक्यातील मोढा बु., वडोद चाथा, वडाळा, बोजगाव, अंभई, शेखपूर, पिंपळगाव घाट येथे रस्ते व विविध विकासासाठी शासनाच्या विविध विभागातून जवळपास १३ कोटी ५० लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. शनिवारी (दि. ६ ) अब्दुल सत्तार(Abdul sattar) यांच्याहस्ते विविध गावात या मंजूर कामांचे भूमिपूजन संपन्न झाले. या कामाला त्वरित सुरुवात होणार असल्याने या गावात विकास कामांसोबत प्रमुख रस्ते चकाचक होणार आहेत.

मोढा बु. येथे सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत मोढा, मंगरूळ ते रहिमाबाद रस्त्याची सुधारणा करणे ३ कोटी ५० लाख, वडोदचाथा येथे जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत गुरूनाथ मंदिर ते अंबाबाई देवी मंदिर पर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे १० लाख, तर प्रजिमा ते अंबाबाई देवस्थान पर्यंत जोडरस्त्याची सुधारणा करणे २५ लाख, वडाळा येथे सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत वडाळा, वडोदचाथा-भराडी रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ५ कोटी ५० लाख, जिल्हा परिषद विभाग अंतर्गत वडाळा येथे स्मशानभूमी सुशोभीकरण व तार कंपाउंड करणे १० लाख या कामांचा समावेश आहे.

तसेच बोजगाव येथे गावांतर्गत रस्ता पेव्हर ब्लॉक बसविणे व गावात पथदिवे बसविणे १० लाख, अंभई येथे भराडी रस्त्याची दुरुस्ती करणे २ कोटी, शेखपूर येथे मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत रस्त्याची सुधारणा करणे ३५ लाख तर पिंपळगाव घाट येथे आमठाणा, अंभई उंडणगाव रस्त्यावरील खेळणा नदीवर पुलाचे बांधकाम करणे १ कोटी ६९ लाख असे एकूण जवळपास १३ कोटी ५० लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे उदघाटन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, जि. प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!