🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपतूच्या आत्महत्यानंतर त्याची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्ती वर संशय घेण्यात आला होता. या घटनेने संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. या प्रकरणी रियावर सुशांतच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर सुशांतच्या आत्महत्याची चौकशी करत असताना ड्रग्स प्रकरणात रियाला एनसीबीने ताब्यात घेतलं. जामिनावर रिया घरी परतली. सुशांत प्रकरणानंतर आता अभिनेता सलमान खानचा लोकप्रिय शो ‘बिग बॉस १५’ च्या नव्या सीजनमध्ये रिया चक्रवर्ती दिसणार असल्याची चर्चा होत आहे.
रिया चक्रवर्ती ‘बिग बॉस १५’ मधून ती सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अडकल्यानंतर तिची बाजू लोकांसमोर मांडणार आहे, आणि तिच्यावर लावलेल्या आरोपांवर ती मनमोकळ्यापणाने स्पष्टीकरण देताना दिसून येणार, असं बोलल जात आहे. त्यामूळे या शोमधून स्वतःची इमेज चांगली करण्यासाठी रिया प्रयत्न करणार, असे म्हंटले जात आहे.
https://www.instagram.com/p/CBLTCV1nXNQ/?utm_source=ig_embed&ig_rid=455d0601-ca03-41ee-b404-f3a10689e7c2
गेल्या दोन वर्षापासून जे कलाकार लाइमलाइटपासून दूर राहिले आहेत, अशा कलाकारांना नव्या सीजनमध्ये घेणार आहे. यामुळे या शो च्या माध्यमातून अनेकाना चांगलीच लोकप्रियता मिळते. तर काहीचे ताशेरे ओढले जातात. ‘बिग बॉस’ शोची मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोइंग आहे. ‘बिग बॉस १५’ च्या नवीन भागविषयी चाहते आतुर असून यात आणखी कोणत्या स्पर्धकांची नाव समोर येणार हे लवकरच समजू शकेल. सध्या मात्र हा शो येण्यापूर्वीच याची चर्चा सुरू असल्याने अनेक वेगवेगळ्या बाबी समोर येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- अंतिम सामन्यासाठी कोहली सज्ज ; म्हणाला, सरावाची गरज…
- संजय राऊतांच ‘ते’ आमंत्रण आम्ही स्वीकारतो; आशिष शेलारांच्या विधानाने उत्सुकता वाढली
- ऱ्हदयद्रावक! मायलेकीसह पुतणीचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू
- अजब ! 5G याचिकेवरील सुनावणीवेळी जुही चावला लागल्या गाणी गायला, कामकाजात आणले व्यत्यय
- एकच धून…६ जून ! शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य होण्यासाठी संभाजीराजेंनी जाहीर केली लिंक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
