जालनाः गोवा आणि उत्तर प्रदेशातील मतमोजणीतून हे स्पष्ट होत आहे कि जनतेची पुन्हा भाजपला पसंती आहे. यूपी आणि गोव्यात शिवसेना सपशेल फेल झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मते मिळाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. याच संदर्भात भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना जिथे गेली तिथे डिपॉझिट जप्त होते, असा खोचक टोला दानवेंनी शिवसेनेला लगावला आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर उत्तर प्रदेश आणि गोव्यातही पक्ष विस्ताराचे धोरण ठेवत शिवसेना या निवडणुकीच्या रिंगणात उतरली. याआधीही शिवसेनेने असे प्रयोग केले आहेत. मात्र तेव्हाही फारसे यश मिळालेले नाही. गोवा आणि उत्तर प्रदेशात शिवसेनेला हार पत्करावी लागणार, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यामुळे शिवसेना जिथे गेली तिथे डिपॉझिट जप्त होते, अशी टीका रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.
शिवसेना राष्ट्रीय पक्ष नाही
शिवसेना राष्ट्रीय पक्ष होण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांचे हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, या शब्दात दानवेंनी शिवसेनेवर प्रहार केला.
“लढत समाधानी होती पण पराभव…”, उत्पल पर्रीकरांची पहिली प्रतिक्रिया
भाजपशी बंड करत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. आता पराभवानंतर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “एक अपक्ष उमेदवार म्हणून मी लढत चांगली दिली. सर्व मतदारांचे मी आभार मानतो. लढत समाधानी होती. पण पराभव किंचित निराशाजनक आहे.”, अशी प्रतिक्रिया उत्पल पर्रीकर यांनी दिली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
