Share

आलियाची सावत्र बहीण पूजा भट्ट काय म्हणाली ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाबद्दल …

Published On: 

मुंबई :  आलिया भट्टचा अलिकडेच प्रदर्शित झालेला ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट बराच गाजला. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानं तुफान गल्ला जमवला आहे. एवढंच नाही तर आता हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्येही दाखल झाला आहे. या चित्रपटाचं अगदी प्रेक्षकांपासून ते समीक्षकांपर्यंत सर्वांनीच कौतुक केलं आहे. त्यानंतर आता आलियाची सावत्र बहीण आणि अभिनेत्री पूजा भट्टनं या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री पूजा भट्ट म्हणाली, ‘आलियाचा हा चित्रपट मी पहिल्याच दिवशी पाहिला होता. प्रेक्षकांचा चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून मी हैराण झाले होते कारण जेव्हा तुम्ही मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहता तेव्हा प्रेक्षकांकडून तुम्हाला ओरडणं, शिट्ट्या वाजवणं अशाप्रकारच्या प्रतिसाद अपेक्षित नसतो. पण संजय लीला भन्साळींच्या या चित्रपटानं हे सिद्ध केलं की आलिया एक उत्तम अभिनेत्री आहे. आलिया आधी एक मुलगी होती पण आता ती एक महिला आहे आणि यात ती खूपच उत्तम आहे.’ पूजा ही आलियाची सावत्र बहीण असली तरी या दोघींमध्ये खूप चांगलं बॉन्डिंग आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर पूजानं आलियाच्या अभिनयाचं खूप कौतुक केलं आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!