🕒 1 min read
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशात भाजपला बहुमत मिळाले आहे. कलांनुसार भाजपला युपीत २७१ जागा मिळाल्या आहेत. योगी आदित्यनाथ यांचे सरकार पुन्हा स्थापन होण्याची चिन्हे युपीत निर्माण झाली आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर समाजवादी पक्ष आहे. भाजपकडून अनेक प्रतिक्रिया उमटत असतानाच आता भाजप खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांनीही आपली प्रतिक्रिया देत भाजपची ताकत दाखवून दिली आहे.
“आमचे सरकार स्थापन होणार हे आम्हाला आधीच माहीत होते. आम्ही विकासाच्या प्रत्येक पैलूसाठी काम केले आहे. म्हणूनच जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. बुलडोझरसमोर काहीही येऊ शकत नाही, कारण ते एका मिनिटात सर्वकाही संपवू शकते, मग ते सायकल असो किंवा इतर काहीही.”,अशी प्रतिक्रिया भाजप खासदार हेमा मालिनी यांनी दिली आहे.
दरम्यान ‘लडकी हु लड सकती हू..’ म्हणत काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी महिला सक्षमीकरण हा मुद्दा निवडणुकीसमोर ठेवला होता. मात्र काँग्रेसचा दारुण पराभव होतानाचे निकाल समोर येत आहेत. युपीत पुन्हा भगवा येणार असल्याचे आता भाजपकडून म्हटले जात आहे. दरम्यान युपिसह चार राज्यांत भाजप आघाडीवर असून भाजपकडून मुंबईत नागरिकांना लाडू वाटून उत्साह साजरा करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
“लढत समाधानी होती पण पराभव…”, उत्पल पर्रीकरांची पहिली प्रतिक्रिया
-
रोहित शर्माच्या “ऑल टाईम ग्रेट” विधानावर अश्विनची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…
-
Election Result 2022 : पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पराभव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
