Share

Election Result 2022 : “आम्ही फक्त शाब्दिक टीका केली नाही त्यामुळे…”, भाजपच्या यशावर सुधीर मुनगुंटीवारांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज (१० मार्च) जाहीर होणार असून यामध्ये पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा समावेश आहे. तसेच संपूर्ण देशाचे या निकालांकडे लक्ष लागले असून सकाळी ८ वाजता या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, युपीत भाजपला बहुमत मिळाले असून कलांनुसार भाजप २७४ जागांनी आघाडीवर आहे. तर त्या खालोखाल सपाला १२० जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे युपीत पुन्हा एकदा भगव्याचंच राज्य येणार असल्याचे निकाल हाती येत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की,‘सर्व मतदारांना धन्यवाद. विजयाचा आनंद आहे पण त्यापेक्षा जास्त आनंद आहे तो जनतेची सेवा करण्याची संधी मतरुपी आशीर्वाद देऊन जनतेनी भाजपला प्राप्त करून दिली त्याचा. आम्ही अमृत महात्सव वर्षांमध्ये आहोत, अपेक्षा हीच आहे की स्वातंत्र्यानंतर लाखो शहिदांनी प्राणाची आहुती देत भारत मातेच्या चरणी स्वातंत्र्याचा मंगलकलश अर्पण केला. तरीही गोरगरिबांचे स्वप्न पूर्ण होत नव्हतं.’

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींजींच्या नेतृत्वामध्ये आपला देश हा बहिश्विक नेतृत्व करायला निघाला आहे. आणि दुसरीकडे सर्व सामान्यांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने या अमृत महोत्सवाच्या वर्षात जे घराणेशाही, जातीयवाद, आहे याला मतदारांनी झटका दिला आणि चार खाणे चीत केलं याचा मला अभिमान आहे. तसेच आम्ही फक्त शाब्दिक टीका केली नाही त्यामुळे हा विजय झाल्याचेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!