नवी दिल्ली : भारतीय महीला क्रिकेट संघाची जलदगती गोलंदाज झुलन गोस्वामीने आपल्या नावावर एक मोठा विक्रम केला आहे. महीला विश्वचषकात सर्वाधिक जास्त विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत तिने अव्वल स्थान गाठले आहे. तिने आतापर्यंत महीला विश्वचषकात ३९ विकेट्स घेतल्या आहेत. तिने ऑस्ट्रेलियाची माजी गोलंदाज लीन फुलस्टन हिच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
झुलनने हा कारनामा न्युझीलंडविरुद्धच्या सामन्यात केला आहे. तिने या सामन्यात ४१ धावा देत १ विकेट्स घेतली आहे. त्याचबरोबर तिने हा विक्रम केला आहे. तिने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात २६ धावा देत २ विकेट्स घेतल्या होत्या.
झुलन बद्दल बोलायचे झाले तर तिने महीला क्रिकेटमध्ये बरेचसे विक्रम आपल्या नावे केले आहेत. तिला २००७ साली ‘आयसीसी वूमन क्रिकेटर ऑफ द ईयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ती वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज आहे. ३९ वर्षाच्या झुलनला आतापर्यंत एक ही विश्वचषक जिंकण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे यावर्षीचा विश्वचषक जिंकून भारतीय संघ तिला गिफ्ट देणार का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. कारण हा तिचा कारकिर्दीतील शेवटचा विश्वचषक असेल.
महत्वाच्या बातम्या :

