मुंबई : अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. रितेश फक्त बॉलिवूड पुरता मर्यादित राहिला नाही. त्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. ‘लय भारी’ हा त्याचा पहिला मराठी चित्रपट. नुकतंच त्याने आषाढी एकादशीनिमित्त एक पोस्ट शेअर करत दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केल्याची माहिती दिली आहे.
रितेशने त्याच्या इंस्टाग्रामवरून फोटो करत कॅप्शन मध्ये लिहिले की, “आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पांडुरंगाच्या साक्षीने मी मराठी चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवलं आणि आज त्याच विठूमाऊलीच्या आषाढीला सांगतांना अतिशय आनंद होतोय की, मी दिग्दर्शित केलेल्या पहिल्या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं आहे.”
https://www.instagram.com/p/Cf0nSsvrdMU/
पुढे त्याने लिहिले की, “अनेक अडचणीतून मार्ग काढत मी आणि माझ्या टीमने पहिला टप्पा यशस्वीपणे गाठला आहे आणि आता पुढचा पूर्णत्वाचा प्रवास आणखी बरंच शिकवणारा असणार आहे पण जर तुमच्या पाठीशी तुमची जिवाभावाची माणसं असतील तर हा प्रवास आणखी सोपा होतो. अशाच एका जिवाभावाच्या माणसाची साथ आमच्या चित्रपटाला लाभली ते म्हणजे ‘सलमान भाऊ’ . माझ्या पहिल्या मराठी चित्रपटाला भाऊंनी #लईभारी साथ दिली होती आता भाऊने माझ्या पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटात आणखी एक #वेड केलंय. थॅक्यु भाऊ. लव यू. तुम्हा सर्वांच्या सदिच्छांमुळे वेड पूर्ण झाला आहे. आणि आता… वेडेपणा सुरु होणार आहे. तेव्हा भेटूया लवकरच… चित्रपटगृहात !! अशी पोस्ट शेअर करत त्याने सलमान खानचे देखील आभार मानले आहेत.
महत्वाच्या बातम्या :


