Share

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन आज होणार ऑनलाईन मेळावे

Published On: 

मुंबई : कोरोनाने जगभरात थैमान घातले असून याचा मोठा परिणाम भारतात आणि महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात विजयादशमीच्या निमित्ताने राजकीय जुगलबंदी दरवर्षी पाहायला मिळते मात्र यंदा काहीसं वेगळे चित्र पाहायला मिळत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मेळावे घेणाऱ्या सर्वानीच यंदा मेळावे ऑनलाईन करण्यावर भर दिला आहे. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी झाला असून असून सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना ऑनलाईन मार्गदर्शनकेले.

भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा यांचा भगवान भक्तिगडावरील मेळावा यंदा ऑनलाईन होणार आहे. पंकजा मुंडेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे. तर आज शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कऐवजी सावरकर सभागृहात फक्त 50 जणांच्या उपस्थितीत होणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतरचा उद्धव ठाकरे यांचा पहिलाच दसरा मेळावा आहे.

दरम्यान, नागपुरात बोलताना भागवत यांनी मोदी सरकारचे कौतुक केले. स्वदेशी, स्वावलंबन, नवीन शिक्षण धोरण या मुद्दयांवर सरसंघचालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारची पाठ थोपटली. शासनाचे कामकाज पारदर्शक असून जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याची क्षमता सरकारमध्ये आह असं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!