Share

राष्ट्रवादीने विश्वासात न घेतल्यास ‘या’ निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा !

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : पारनेर नगरपंचायतीचा कार्यकाल २५ नोव्हेंबर २०२० रोजी संपत असून नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीसाठी प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला असून ही प्रक्रिया २१ ऑक्टोबर ते २४ डिसेंबर २०२० या कालावधीत घेण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यामुळे आता पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी उडणार आहे. आगामी नगरपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पक्षाला विश्वासात घेवुन सन्मानपूर्वक जागा दिल्या तर ठिक अन्यथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र निवडणूक लढविण्याची घोषणा तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकले, खादी ग्रामोदयोग संघाचे अध्यक्ष हसनशेठ राजे यांनी केली आहे.

दरम्यान, नगरपंचायतीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना आत्तापासूनच वेग आला आहे. सध्या नगरपंचायतीवर विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांचे वर्चस्व आहे. नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणण्याची घोषणा राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. पारनेर शहर हे माजी आमदार विजय औटी यांचे गाव असल्याने नगरपंचायत ताब्यात घेऊन आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी माजी आमदार विजयराव औटी हे देखील कसोशीने प्रयत्न करणार आहेत.

तर भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी देखील नगरपंचायत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत, त्यामुळे भाजपाचे तालुकाध्यक्ष वसंतराव चेडे हे पारनेर शहरातीलच असल्याने तेही भाजपचा स्वतंत्र पॅनल उभा करण्याच्या तयारीत आहेत. पारनेर नगरपंचायत निवडणुकीच्या आधीच आता काँग्रेसनेही स्वबळाचा नारा दिल्यामुळे पारनेरमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!