🕒 1 min read
सिंधुदुर्ग : विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला गळती होती. अनेक बडे नेते पक्षाला रामराम ठोकत होती. मात्र राष्ट्रवादीने सत्ता पुन्हा काबीज केल्यानंतर आता पक्षात जोरदार इनकमिंग सुरु झाले आहे. नुकतेच भाजपचे बडे नेते एकनाथ खडसे यांनी कमळाची साथ सोडत हातात घड्याळ बांधले आहे. या प्रवेशावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘पिच्चर अभी बाकी है’ म्हणत येत्या काळात राष्ट्रवादीमध्ये जोरदार इनकमिंग होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
आता सिंधुदुर्गात राष्ट्रवादीने मित्रपक्ष काँग्रेसला धक्का दिलाय. कोकण काँग्रेसचे नेते तसंच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये काका कुडाळकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदार संघात काँग्रेसकडून काका कुडाळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी त्यांनी निवडणूकीतून माघार घेतली होती. स्वभिमान पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कुडाळकर यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला होता.
कुडाळकरांच्या माघारीने काँग्रेस पक्षावर नामुष्कीची वेळ आली होती. तेव्हापासून वर्षभर ते पक्षात अडगळीत होते. मात्र आता त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. कोकणात राष्ट्रवादीच्या वाढीसाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याचं कुडाळकर यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘वीर सावरकारांप्रमाणे मलासुद्धा तुरूंगात टाकण्याचा प्रयत्न होतोय’
- फडणवीस कोरोनातून लवकर बरे व्हावेत, त्यांना शुभेच्छा : एकनाथ खडसे
- राष्ट्रवादीने विश्वासात न घेतल्यास ‘या’ निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा !
- “मी बरा होण्याच्या मार्गावर”, अँजिओप्लास्टीनंतर कपिल देव यांची प्रतिक्रिया
- राष्ट्रवादीत आल्याने मी टेन्शन फ्री झालो आहे, भाजपात कधी चौकशी लागेल याची भीती होती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
