🕒 1 min read
IND vs BAN 1st Test | चट्टोग्राम: आज बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी सामना (IND vs BAN 1st Test) जहुर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळला जात आहे. भारताने पहिल्या कसोटी सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर या सामन्यामध्ये भारताची टॉप ऑर्डर काही चांगला कमाल करू शकली नाही. वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये फ्लॉप ठरलेल्या ऋषभ पंत (Rishabh Pant) ने कसोटी सामन्यांमध्ये स्फोटक फलंदाजी केली. मात्र, अर्धशतक पूर्ण होण्याच्या क्षणी ऋषभ पंतला मेहदी हसन मिराजने बाद केले. अर्धशतक पूर्ण झाले नसले तरी पंतच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली होती. भारताचे सलामीवीर शुभमन गिल आणि केएल राहुल या जोडीने 41 गावांची भागीदारी केली. दोघे मैदानावर सेट होत असताना तैजुल इस्लामने गिलला 20 धावांवर बाद केले. त्याच्या पाठोपाठ राहुल देखील 22 धावा करत आउट झाला. दोन्ही सलामीवीर पव्हेलियनमध्ये परतल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली डाव सावरतील अशी अपेक्षा होती. मात्र, विराट कोहली 1 धाव करून बाद झाला.
48 धावांवर 3 बाद अशी भारतीय संघाची अवस्था झालेली असताना ऋषभ पंत मैदानावर खेळण्यासाठी आला. मैदानावर येतच रिषभ पंतने स्फोटक फलंदाजी सुरू केली होती. एकीकडून पंत, तर दुसरीकडून चेतेश्वर पुजारा स्फोटक फलंदाजी करत होता. ब्रेकपर्यंत दोन्ही खेळाडूंनी भारतीय संघाला शतकापर्यंत पोहोचवले. ब्रेकपूर्वी 30 धावांवर खेळणाऱ्या पंतने ब्रेकनंतर 45 चेंडू तब्बल 46 धावा ठोकल्या.
त्यानंतर मेहदी हसन मिराजच्या चेंडूवर पंत बाद झाला. त्यामुळे पंतला या सामन्यामध्ये आपले अर्धशतक पूर्ण करता आले नाही. पंत 46 धावांवर बाद झाला. या खेळीदरम्यान पंतने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याचबरोबर पंत भारतासाठी सर्वात वेगवान 20 षटकात मारणारा फलंदाज ठरला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal | “पुस्तकावर बंदी घालाल, पण लेखकाच्या लेखणीवर…”; ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’वर भुजबळांनी राज्य सरकारला सुनावलं
- Ranji Trophy | रणजी पदार्पणामध्ये अर्जुन तेंडुलकरचे शानदार अर्धशतक
- Sushma Andhare | “उद्धव ठाकरेंनी सुषमा अंधारेंची पक्षातून हकालपट्टी करावी”; मागणी कोणी आणि का केली?
- IND vs BAN 1st Test | सचिन-गावस्करला मागे टाकत अवघ्या 10 धावांमध्ये श्रेयस अय्यरने केला ‘हा’ विक्रम
- Harshvardhan Jadhav | “मंत्रिपदासाठी बायका अमित शहा खाली…”; चंद्रकांत पाटलांवर टीका करताना हर्षवर्धन जाधवांची जीभ घसरली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

