🕒 1 min read
Harshvardhan Jadhav | औरंगाबाद : भाजप नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुदान न मागता भीक मागून शाळा सुरु केल्या, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड येथे केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध अनेक नेत्यांनी नोंदवला. अशातच कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली आहे.
या संदर्भातला व्हिडीओ त्यांनी फेसबूक पेजवर शेअर केलाय. ते म्हणाले, “चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबडेकर आणि महात्मा फुले यांनी भीक मागून शाळा उघडल्या असं बोलेल मी ऐकलं. नंतर ते म्हणाले की, माझ्या शब्दाचा विपर्यास झाला. अरे बाबा त्या वेळेला बहुजन आणि मुस्लिम लोकांना शिक्षण मिळत नव्हतं.”
“ज्यांच्या खाली काही लोकं आपल्या बायका घालतात ती मंडळी ती मंडळी बहुजन समाजाला शिक्षण मिळून देत नव्हती. ‘शिका संघटित व्हा, संघर्ष करा’ हे घोषवाक्य डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी सांगितलं. त्यामुळे लोकांना शिक्षण मिळायला लागलं. त्यामुळे आम्ही आजही म्हणतो की, भीमा तुझ्या जन्मामुळं…आणि तुम्ही त्यांना बोलताय की त्यांनी भीक मागितली म्हणून.
पुढे ते म्हणाले, “मला तर काही लोकांनी हे सांगितलं की, काही महाराष्ट्रातले लोकं असे आहेत जे आपल्या बायका अमित शहाखाली घालतात. का? तर आम्हाला मंत्री करा म्हणून.” चंद्रकांत साहेब २०१४ च्या आधी आपण कोण आहात हे महाराष्ट्राला माहित नव्हतं. अचानकच आपण उगवलात. कोण काही बोललं की, त्याच्यावर ३०७ टाकताय. बापाचा माल आहे का?, असा टोलाही हर्षवर्धन जाधव यांनी लगावला.
एकदा आत्मपरीक्षण करा कि तुमच्या मंत्रिमंडळात असे कोण कोण लोकं आहेत जे मंत्रिपदासाठी आपल्या बायका अमित शहाखाली घालतात. आता तो कोणता अमित शाह? गृहमंत्री अमित शाह की, दुसरा कोणता हे तुम्ही पोलीस यंत्रणांकडून तपासा. किमान तेवढं घाणेरडं काम आमच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं नाही. त्यामुळे चांगल्या लोकांना असे शब्द वापरण्याच्या अगोदर ‘जरा अपने गिरेबान में झाककर देखो पाटील साहब आपला गिरेबान कितना गंदा है’, असं हर्षवर्धन जाधव म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या :
- Weight Gain Tips | हिवाळ्यामध्ये वजन वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश
- BMW Upcoming Launch | जानेवारीमध्ये बीएमडब्ल्यू लाँच करू शकते ‘या’ कार
- Sanjay Raut | “राम मंदिराचा प्रश्न न्यायालयात सुटतो, मग कर्नाटक सीमाप्रश्न का नाही?”; संजय राऊतांचा परखड सवाल
- Hair Care | केस गळती थांबवण्यासाठी आवळ्याचा ‘या’ पद्धतीने करा वापर
- Sanjay Raut | रोहित पवारांच्या बेळगाव दौऱ्यानंतर राऊतांचा राज्य सरकारला टोला; म्हणाले, ”इच्छा आणि हिम्मत असली की…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

