Sushma Andhare | पुणे : अनेक नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. अशातच आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी संतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “रेड्याला शिकविण्याचे सामर्थ इथल्या संतांमध्ये आहे म्हणुन चमत्कार …आरे तुम्ही रेंड्यांना शिकवलं रे..! माणसांना कुठं शिकवलं”, असं विधान सुषमा अंधारे यांनी केलं होतं त्यावर वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे.
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) या हिंदू धर्मियांच्या देव देवतांबद्दल बोलतानाचा व्हिडीओ समाज माध्यमात सर्वत्र व्हायरल होत असताना आता वारकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी पश्चिम बंगालच्या गंगा सागर येथील समुद्र किनारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी सुषमा अंधारे येणाची त्वरित पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
त्याचबरोबर राज्यातील वारकऱ्यांना शपथ देऊन सुषमा अंधारे ज्या पक्षात जातील त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ दिली आहे व आगामी काळात राज्यातील वारकरी अनेक अशी शपथ घेतली अस आवाहन केलं आहे. त्यामुळे आगामी काळात सुषमा अंधारे व वारकरी संघटना यांच्यात नवीन संघर्ष बघायला मिळू शकतो.
सुषमा अंधारे यांनी संतांबाबत चिड आणणारी वक्तव्ये केल्याने सर्व वारकऱ्यांमध्ये संताप आहे. सुषमा अंधारे राजकीय फायद्यासाठी संताचा अपप्रचार करणं बंद करा, अशी सर्व संतांची आणि वारकरी संप्रदायाची मागणी असून तात्काळ माफी मागा, असं वारकरी कीर्तनकार संजीवनी हिंगोलीकर यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Harshvardhan Jadhav | “मंत्रिपदासाठी बायका अमित शहा खाली…”; चंद्रकांत पाटलांवर टीका करताना हर्षवर्धन जाधवांची जीभ घसरली
- Weight Gain Tips | हिवाळ्यामध्ये वजन वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश
- BMW Upcoming Launch | जानेवारीमध्ये बीएमडब्ल्यू लाँच करू शकते ‘या’ कार
- Sanjay Raut | “राम मंदिराचा प्रश्न न्यायालयात सुटतो, मग कर्नाटक सीमाप्रश्न का नाही?”; संजय राऊतांचा परखड सवाल
- Hair Care | केस गळती थांबवण्यासाठी आवळ्याचा ‘या’ पद्धतीने करा वापर


