Share

Ranji Trophy | रणजी पदार्पणामध्ये अर्जुन तेंडुलकरचे शानदार अर्धशतक

Published On: 

🕒 1 min read

Ranji Trophy | गोवा: मंगळवारपासून सुरू झालेल्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धेमध्ये माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) चा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याने क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. या स्पर्धेमध्ये अर्जुन तेंडुलकर गोवा संघामध्ये सामील झाला आहे. हंगामापूर्वीच अर्जुनने मुंबई सोडून गोवा संघात जाण्याचा निर्णय घेतला होता.

रणजी (Ranji Trophy) पदार्पणामध्ये अर्जुन तेंडुलकरचे शानदार अर्धशतक

राजस्थान आणि गोवा यांच्यामध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यामध्ये राजस्थानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यामध्ये 23 वर्षीय अर्जुन तेंडुलकरचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता. पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या अर्जुन तेंडुलकरने आपल्या फलंदाजीने अर्धशतक झळकावले आहे.

अर्जुन तेंडुलकर हा एक डावखुरा वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. हा खेळाडू गोव्याआधी मुंबई संघाचा भाग होता. मात्र, मुंबई संघामध्ये त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर तो गोवा संघात सामील झाला असताना, त्याला रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. आज सुरू असलेल्या सामन्यांमध्ये पाचवी विकेट पडल्यानंतर अर्जुन मैदानावर उतरला होता. मैदानावरच येतात त्याने एखाद्या अनुभवी फलंदाजाप्रमाणे स्फोटक फलंदाजी करत अर्धशतक झळकावले आहे.

गोवा संघाची सुरुवात खराब झाली असताना अर्जुनने मैदानावर येऊन अर्धशतक पूर्ण केले आहे. यामध्ये गोवा संघाचा सलामीवीर सुमिरन आमोणकर 9 धावा करत बाद झाला, तर दुसरी विकेट अमोघ देसाईच्या रूपाने गेली. त्यानंतर सुयश प्रभुदेसाई आणि स्नेहलने तिसऱ्या विकेटसाठी भागीदारी करत 105 धावांची खेळी खेळली. यानंतर अर्जुन तेंडुलकर मैदानावर खेळण्यासाठी आला. सुयशने आणि अर्जुनने संघाला या सामन्यामध्ये 300 चा आकडा पार करून दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!