Share

दंगल गर्ल बबिता फोगाट होणार आई, लवकरच एक नवीन पाहुणा येणार!

Published On: 

मुंबई : खऱ्या आयुष्यातली  दंगल गर्ल बबीता फोगाट हिच्या घरी लवकरच एक नवीन पाहुणा येणार आहे. बबिता गरोदर असून तिने इंस्टाग्राम अकाउंट वर फोटो शेअर करून हि बातमी दिली आहे .

कॉमनवेल्थ मध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या बबिताचे गेल्यावर्षी विवेक सुहाग याच्यासोबत लग्न झाले. विवेक हादेखील कुस्तीपटू असून त्यांनी भारत केसरी हा किताब जिंकलेला आहे. सध्या तो भारतीय रेल्वे मध्ये कामाला आहे.

बबिता आणि विवेक एकमेकांना सहा वर्षांपासून ओळखतात. दोघांची भेट दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी आपापल्या कुटुंबीयांना आपल्या नात्याविषयी कल्पना दिली. त्यानंतर दोघांच्याही कुटुंबीयांनी जून महिन्यात त्यांचा विवाह निश्चित केलेला. डिसेंबर महिन्हयात हरयाणातील बलाली या गावी बबिता आणि विवेक यांचा विवाह सोहळा पार पडला. हा विवाह पारंपरिक पद्धतीने आणि अतिशय साधेपणाने पार पडला.

नुकतच कंगणा विरुद्ध शिवसेना वादामध्ये भाजपची सदस्य असलेली बबिता फोगाटने उडी घेतली होती. तिने ट्विटर वरून शिवसेनेवरती जोरदार टीका केली होती. तिने ट्विट मध्ये लिहिले होते कि ‘कंगणा हिंदुस्तानची कन्या आहे. तिला मुंबईत येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. शिवसेने आपलं खार रूप दाखवलं आहे’ या शब्दात तिने शिवसेनवर निशाणा साधला होता.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!