🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात झालेल्या सत्तानाट्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. आता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतरच महाराष्ट्रात नवीन मंत्रिमंडळ स्थापन होईल, असे मानले जात आहे. पण त्याच दरम्यान, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पक्षाच्या नेत्यांसोबत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत स्वत: आणि देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यातील फोनवरील संभाषणाची माहिती दिली. यानंतर येथील राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारीही शिवसेनेच्या जुन्या-नव्या आमदारांची आवश्यक बैठक बोलावण्यात आली होती. यादरम्यान त्यांनी सांगितले की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना फोन केला आणि ‘अस्सलाम वालेकुम’ने संभाषण सुरू केले. राजनाथ यांच्या बोलण्यावर त्यांनी आक्षेप घेतला तेव्हा संरक्षणमंत्र्यांनी ‘जय श्री राम’ म्हणत गोष्टी पुढे नेल्या.
एनडीएकडून राष्ट्रपती निवडणुकीसाठी राजनाथ सिंह यांच्याकडे समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत राजनाथ सिंह देशभरातील पक्षांच्या प्रमुखांशी बोलून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे आवाहन करत आहेत.
“राजनाथ सिंह यांच्या ऑपरेटरला कदाचित मेहबुबा मुफ्तींना फोन लावायचा असेल. कारण त्या त्यांच्या सहकारी होत्या. चुकून ऑपरेटरने उद्धव ठाकरेंना फोन लावला असेल,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले, जे एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीपर्यंत अडीच वर्षे टिकले. ते सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेवर हिंदुत्वाशी तडजोड केल्याचा आरोप होत आहे. हिंदुत्वाशी तडजोड केल्याबद्दल भाजपकडून शिवसेनेवर हल्लाबोल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- CM Eknath Shinde : “औरंगाबादच्या नावाला स्थगिती नाही, उद्या कॅबिनेटमध्ये अधिकृत निर्णय घेऊ”; मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Shahaji Bapu Patil | पुन्हा घुमणार “काय झाडी, काय डोंगार…” चा आवाज; शाहाजी बापू पाटील येणार ‘थुकरटवाडीत’
- IND vs ENG : लॉर्ड्सवर टीम इंडिया अडचणीत असताना चाहत्यांना आली धोनीची आठवण; पाहा VIDEO!
- Devendra Fadnavis’ Aukshana : राज ठाकरेंच्या पत्नींने केले देवेंद्र फडणवीस यांचे औक्षण
- Delhi : दिल्ली पुन्हा हादरली! धावत्या कारमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; घटनेचा बनवला VIDEO
- Sanjay Raut : “चिठ्या देतात, माईक खेचतात…” ; संजय राऊतांची शिंदे सरकार टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
