महाराष्ट्र देशा डेस्क: आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय रुपयाची सातत्याने घसरण होत आहे. काल म्हणजेच 12 जुलै रोजीही अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 13 पैशांनी घसरला. त्यामुळे रुपया इतिहासातील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. या घटनेवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने ट्विट केले आहे. ज्यावर अनेक युजर्सनी सकारात्मक कॉमेंट्स केल्या असून काहींनी मात्र तिला ट्रोल देखील केले आहे.
या संबंधीची पोस्ट शेअर करताना रिचा चढ्ढाने एक डायलॉग देखील लिहिला आहे. रिचा म्हणते की “रुपया म्हणत असेल- अभी तो हमे और जलील होना है। रुपयाने सेंचुरी मारलीच, शाब्बास!”. रिचाच्या ट्विटवर संजीव गोयल नावाच्या व्यक्तीने लिहिले की, “माझा आयात निर्यातीचा व्यवसाय बिकट स्थितीत आहे. मी आयात केलेल्या वस्तूंचे पैसे देण्यासाठी मी डॉलर घसरण्याची वाट पाहत होतो. पण मग मी काल पैसे दिले. नुकसान झाल्याचं वाईट वाटलं. पण आज डॉलरची किंमत पुन्हा 63 पैशांनी वाढली. त्यामुळे आता मला आनंद होत आहे की माझे 23,000 रुपयांचे आणखी नुकसान टळले.” तर मोहम्मद फ्यूचर नावाच्या व्यक्तीने कॉमेंट केली की, “रुपयाची घसरण होण्याचेही अनेक फायदे आहेत रिचा जी. कधीतरी सविस्तर सांगेन.” अशाच प्रकारच्या कॉमेंट्समुळे रिचाचे ट्विट व्हायरल होत आहे. मुख्य म्हणजे रिचा नेहमीच अश्या सामाजिक विषयांवर तिचे मत सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असते.
https://twitter.com/RichaChadha/status/1546787959319322624
रुपयाची घसरण सुरूच
एक अमेरिकन डॉलर भारतीय चलनाच्या तुलनेत 79.58 रुपये इतका झाला आहे. भारतीय रुपयाचे मूल्य मार्च 2022 पासून सातत्याने घसरत आहे. मात्र रुपया आता चालू असलेल्या जुलै महिन्यात नीचांकी पातळीवर गेला आहे. जानेवारीमध्ये डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन 74 च्या आसपास होते. त्यानंतर मार्चमध्ये पुन्हा एकदा रुपया 77 च्या खाली घसरला. आता तर ही घसरण 80 च्या पुढे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) देखील ही घसरण रोखू शकत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरची वाढती किंमत हे भारतीय रुपयाची घसरणी होण्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळेच आता परदेशातून वस्तू मागवण्यासाठी भारताला अनेक पटींनी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

