मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानपरिषेदत १२ आमदारांची नियुक्ती केली तर भाजपमधील अनेकजण पक्षातून बाहेर पडतील, अशी भीती आहे. भाजप पक्ष सध्या या फुटीच्या उंबरठ्यावर असल्यामुळेच राजभवनाचं रुपांतर भाजप कार्यालयात करण्यात आल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
दरम्यान राज्यपाल कोश्यारी यांनी अजूनही १२ आमदारांची नियुक्ती केलेली नाहीये. यावरूनच कॉंग्रेसने राज्यपालांवर निशाना साधला आहे. भाजपा सध्या फुटीच्या उंबरठ्यावर आहे. ही फूट थांबवण्यासाठी राज्यपालांचा वापर सुरू आहे. अनेकदा विधानसभेतही म्हटलं आहे की राज्यपाल भवन आता भाजपा कार्यालय झालं आहे. मागच्या काळात भाजपाने मोठ्या प्रमाणात नेत्यांना आयात करुन ठेवलं आहे. भाजपाचे काही आमदार आहेत, त्यांनाही वाटतंय की आता आपण काय मंत्री होणार नाही. त्यामुळे तेही फुटणार आहेत. असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी भाजपाचे अनेक नेते, आमदार माझ्या संपर्कात आहेत. दुसऱ्याही पक्षाचे असतील. म्हणून हे बारा आमदार ज्यादिवशी या महाविकास आघाडीचे होतील, त्या दिवशी पक्ष फुटेल याची भीती त्यांच्या मनात आहे. असे विधानही त्यांनी यावेळी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नवीन पाणीपुरवठा योजनेच्या विद्युत सब स्टेशनजवळ गळती; दोन दिवस औरंगाबादकरांवर जलसंकट!
- ब्रिटनचा ‘तो’ इशारा खरा ठरला; काबूल विमानतळावर मोठा बॉम्बस्फोट
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : आता ‘या’ अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना देखील लागू होणार अनुकंपा धोरण
- पुणे शहरात कोरोना सक्रिय रुग्णांमध्ये आजही वाढ; तर ४ रुग्णांचा मृत्यू
- ‘मुका मोर्चा म्हणाला तेव्हा संजय राऊत तुम्ही गांजाची की अफूची गोळी घेतली होती?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

