Share

….चक्क महसूल विभागाने ‘गाढव’ घेतले ताब्यात

Published On: 

परभणी : पूर्णा महसूल विभागाच्या पथकाने २८ गाढवे ताब्यात घेतली आहेत. पूर्णा रोडवरील कानडखेड शिवारातील नदी पात्रात बॉम्बे ब्रीज खाली छापा मारुन ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात गाढवांच्या मालकांवर अवैध वाळू उपसा केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलाय.

येथील पुर्णा नदीपात्रात बॉम्बे ब्रीजखाली गाढवांच्या साह्याने वाळू उपसा करत असल्याचा प्रकार गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या निदर्शनास आला. तातडीने नायब तहसीलदार दशरथ कोकाटे, मंडळ अधिकारी विजय राठोड, तलाठी अभिजित पाटील, तलाठी रामावशिष्ठ रासवे, बालाजी जाधव, कोतवाल गौतम घाटे, चंद्रशेखर कारले, बालाजी सोळंके, गंगाधर सातपुते आदींच्या पथकास घटनास्थळी पाठवले. या पथकाने पुर्णा नदीपात्रात विविध ठिकाणाहून बॉम्बे ब्रीजखाली गाढवांद्वारे होणाऱ्या वाळू वाहतूकीवर छापा टाकला.

या वेळी वाळू उपसा करणारे तीन तस्कर गाढवांसह तीन मोबाईल जागेवर सोडून पळून गेले. या पथकाने एकूण २८ गाढवे आणि सहा हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल, पाच हजार रुपये किंमतीची एक ब्रास वाळू जप्त केली आहे. गाढवांना तहसील कार्यालयामध्ये जमा करण्यात आले आहे. या प्रकरणी पुर्णा कानडखेड सज्जाचे तलाठी रामवशीष्ट रासवे यांनी पूर्णा पाेलिस ठाम्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तीन जणांविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास जमादार नितीन वडकर करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!