औरंगाबाद : पाणी फाउंडेशन तर्फे सुरू केलेल्या सोयाबीन डिजिटल शाळेचा वर्ग दर रविवारी ११ ते २:३० या वेळेत आमिर खान, किरण राव तसेच सोयाबीन पिकाचे तज्ञ व संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या गावातील सोयाबीन लागवड केलेले शेतकरी फेसबूक व युट्युबवर ऑनलाइन शेती शाळेचा वर्ग भरत असतो. त्याअंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचे नुकतेच बक्षिस जाहीर करण्यात आले.
मागील आठवड्यात डिजिटल शेती शाळेवर आधारित संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातून बक्षीस जाहीर करण्यात आले. प्रथम क्रमांक घेणाऱ्या शेतक-याला सायकल कोळपे, द्वितीय क्रमांकाच्या शेतक-याला कामगंध सापळे व तृतीय क्रमांक घेणारे शेतक-याला पिवळे व निळे चिकट सापळे अशा वस्तू बक्षीस स्वरूपात दिल्या जाणार आहे. या स्पर्धेचे निकाल पाणी फाउंडेशन तर्फे जाहीर करण्यात आले.
यात जिल्हास्तरीय स्पर्धेत फुलंब्री तालुक्यातील सावळाराम जनार्धन दाडे, रतन उत्तम कांबळे, शाकीर सादिक बेग यांना प्रथम क्रमांक मिळाला. तर विठ्ठल पांडुरंग दाढे, बबन मिठू दाडे यांना द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. नितल अनिल साळुंखे, यांची तृतीय क्रमांकाचे बक्षिसासाठी निवड झाली. या विजेत्या शेतक-यांना नायगव्हाण येथे तालुका कृषी अधिकारी काकासाहेब इंगळे तसेच पाणी फाउंडेशनचे प्रादेशिक समन्वयक प्रल्हाद आरसुळ, तालुका समन्वयक असलम बेग, सरपंच जगन्नाथ दाडे यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- आयटीआयसाठी प्रवेशप्रक्रिया सुरु : ९६६ आयटीआयमध्ये १ लाख ३६ हजार जागा उपलब्ध !
- ‘नानांच्या नाना तऱ्हा; ते सकाळी एक बोलतात, दुपारी दुसरं आणि संध्याकाळी…’
- स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेनं केली १० लाखांची मदत; एकनाथ शिंदेनी केलं कुटुंबियांच सांत्वन
- ‘मोदींनी सर्टिफिकेट दिलं म्हणून योगी सरकारचं करोना परिस्थिती हाताळण्यातलं अपयश लपत नाही’
- ‘स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही देशद्रोह कायदा गरजेचा आहे का ?’ ; सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

