Share

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

Published On: 

🕒 1 min read

नांदेड :  राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्योवृत्ती् परीक्षा (NMMS) ही मंगळवार 6 एप्रिल 2021 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आणि दुपारी 1.30 ते दुपारी 3 या कालावधीत जिल्ह्यातील विविध 11 केंद्रावर परिक्षा केंद्रावर दोन सत्रात घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याची माहिती जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील गुजराथी हायस्कुल वजिराबाद या केंद्रात परीक्षार्थी संख्याष 311, मानव्यक विकास उ. मा. वि. देगलूर 129, मिनाक्षी देशमुख उ. मा. विद्यालय अर्धापूर 154, महात्मा फुले वि. बाबानगर नांदेड 257, हु. पानसरे हायस्कुल धर्माबाद 214, म.ज्योतीबा फुले हायस्कुल गोकूंदा किनवट 269, श्री शिवाजी हायस्कुल कंधार 243, जनता हायस्कुल नायगाव 272, पंचशील विद्यार्जन उ. मा. वि. हदगाव 253, शाहु महाराज विद्यालय भोकर 205, महात्मा गांधी उच्च मा. विद्यालय मुदखेड 199 अशी परिक्षा केंद्रांची यादी आहे.

या परीक्षा केंद्राच्या परिसरात बाहेरील व्यक्तींचा उपद्रव होवू नये, म्हणून तसेच ही परीक्षा ही स्वच्छ व सुसंगत पार पाडण्याच्या दृष्टीने आणि सर्व संबंधीतांना नोटीस देवून त्यांचे म्हणणे ऐकून घेणे. या परिस्थीतीत शक्य नसल्याने जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये, या परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात मंगळवारी 6 एप्रिल 2021 रोजी सकाळी 9 ते सायं. 5 वाजेपर्यतच्यार कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी – कर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. वर सांगितलेल्या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स / एस. टी. डी. / आय. एस. डी / भ्रमणध्वनी/ फॅक्स / झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!