Share

‘पूरग्रस्तांना प्रत्येकी एक लाखाची तातडीने मदत करा’ ; गोपीचंद पडळकरांची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या आठवड्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन मोठी आर्थिक हानी झाली आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत शेकडो जणांचा मृत्यू झाला. लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. यामुळे अनेक नागरिकांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते व विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारकडे महत्वपूर्ण मागणी केली आहे.

‘आस्मानी आणि कोरोनाच्या संकटाने मेटाकुटीला आलेल्या व्यापाऱ्यांना व सामान्य जनतेला कुठल्याही निकषाच्या चक्रव्यूव्हात न अडकवता आधी तातडीने प्रत्येकी 1 लाख रूपयाची मदत केली पाहिजे. शिवाय व्यापाऱ्यांना वर्षभरासाठी भाडेपट्टी व वीजबील माफीची मदत जाहीर करून लवकरात लवकर अंमलात आणावी,’ अशी मागणी पडळकर यांनी केली आहे.

तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘कर्जबुडव्या साखर कारखान्यांना 3800 कोटी देण्यासाठी सरकारी तिजोरी उघडली जाते. त्याचप्रमाणे फडणवीस सरकारने केलेल्या मदतीप्रमाणे हे सरकार पूरग्रस्तांना तातडीची मदत का करत नाही?’ असा सवाल त्यांनी केला. तसेच ‘फडणवीस सरकारने तातडीने व कोणतेही निकष न लावता घरपडीला 95000, भाड्याने राहण्यासाठी 25000, व्यापाऱ्यांना 50, 000 तर शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत केली होती. आता तर परिस्थिती महाबिकट आहे. एकीकडे यांच्या ‘लॉकडाऊन -लॉकडाऊन’ च्या खेळामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलंय आणि व्यापारी रडकुंडीला आलाय. असा दुहेरी संकटाचा सामना सामान्य जनता आणि व्यापारी करत आहे,’ असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

दरम्यान आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे, यावेळी राज्य सरकारकडून नुकसानग्रस्तांसाठी पॅकेजची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्य सरकारकडून पूरग्रस्त, दरडग्रस्तांसाठी आर्थिक पॅकेजच्या घोषणेची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!