अमरावती : जिल्ह्यात दरदिवशी वाढत असलेले कोरोनाचे नवीन रुग्ण व मृतकांचे आकडे थरकाप उडवणारे आहे. वाढत्या कोरोनाला आळा बसावा म्हणून महिनाभरापासून निर्बंध होते मात्र, ते कुचकामी ठरले आहे. त्यामुळेच जिल्ह्यात रविवारी (दि.९) दुपारी १२ वाजेपासून १५ मेच्या रात्री १२ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या आठवड्यात शहर व जिल्ह्यात हॉस्पिटल व मेडिकल वगळता सर्वच बंद राहणार आहे. तसेच वैद्यकीय आणि अत्यावश्यक कामाशिवाय कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही, असा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काढला आहे.
कोरोनाच्या परिस्थितीमुळे जिल्हाप्रशासनाने आता निर्बंध अधिक कठोर केलेत. विवाह सोहळ्यांनाही त्याचा फटका बसणार आहे. रविवारपासून सात दिवस जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये लग्न समारंभाला केवळ १५ जणांच्याच उपस्थितीला परवानगी राहणार आहे. त्यापेक्षा अधिक मंडळी उपस्थित राहिल्यास आयोजकांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
लग्न समारंभासारखे गर्दी होणाऱ्या सोहळ्यांच्या माध्यमातून कोरोनाचा अधिक फैलाव होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता लग्नसमारंभांवरच ब्रेक लावण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. जी मंडळी लग्न समारंभ स्थगित करू शकत नाही त्यांना १५ जणांची मर्यादा घालून देण्यात येणार आहे.
नियमांचा भंग केल्यास फौजदारी कारवाई व दंड आकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मंडप सुद्धा टाकण्यास मनाई राहणार आहे. घरगुती पद्धतीने लग्न समारंभ साजरा करण्यात यावा तसेच त्यामध्ये बॅण्ड बाजा तसेच वऱ्हाडींना बंदी राहणार आहे. विशेष म्हणजे जेवणावळी सुद्धा करता येणार नाहीत.
महत्वाच्या बातम्या
- खबरदार! मेडिकलमधून चॉकलेट, आईस्क्रिम विकल्यास होणार कारवाई
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंनी मोदी, राष्ट्रपतींकडे बोट दाखवून वेळकाढूपणा करू नये’
- भारतीय अधिकाऱ्यांचे कौतुक केल्याने पाकचे पंतप्रधान इम्रान खान अडचणीत
- तामिळनाडूतील महिलांना मोफत बस प्रवास, मुख्यमंत्री स्टॅलिन यांची घोषणा
- ‘सर्व राज्यांना मोफत लस द्या’, ममता बॅनर्जींची सुप्रीम कोर्टात याचिका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
