नवी दिल्ली : पाकिस्तानची परिस्थिती सर्वांना माहितेय. अंतर्गत राजकारण आणि नको त्या गोष्टींमुळे पाकिस्तान कधीच भारताची बरोबरी करू शकणार नाही. तेथील राजकीय नेते लष्कराखाली दबलेले आहेतच. पण अधिकारीही काम करण्याबाबत उदासीन आहेत. हीच गोष्ट पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पसंत नाही पडली. त्यामुळे त्यांनी परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांच्या बैठकीत भारतीय अधिकाऱ्यांचे कौतुक करत त्यांच्याकडून शिकण्याचा सल्ला दिला. पण यामुळे पाकच्या अनेक आजी-माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वर्मावर घाव लागला आहे. त्यांनी इम्रान यांच्यावर कडाडून टीका सुरू केली आहे.
त्याचे झाले असे की, पंतप्रधान इम्रान यांनी नुकतीच विविध देशांमधील आपल्या मुत्सद्दी अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत इम्रान आपल्या राजदूतांवर चांगलेच संतापले होते. परदेशातील पाकिस्तानी नागरिकांना मदत करण्यात त्या-त्या देशांमधील राजदूत कमी पडत आहेत. आपल्या नागरिकांसोबत ते निष्ठुरतेने वागतात. पाक अधिकारी अद्यापही वसाहतवादाच्या मानसिकतेत अडकले आहेत, अशी टीका इम्रान यांनी केली.
यावेळी त्यांनी भारतीय दूतावासांमधील अधिकाऱ्यांचे कौतुक केले. परदेशातील भारतीयांना त्यांचे अधिकारी शक्य ती सर्व मदत करतात. आपल्या देशात गुंतवणूक आणण्यासाठीदेखील सक्रिय आहेत. पाक अधिकाऱ्यांना भारतीयांकडून शिकण्याची गरज आहे, असे इम्रान म्हणाले होते. पाक पंतप्रधानांची ही टीका परराष्ट्र सेवेतील माजी अधिकाऱ्यांना चांगलीच झोंबली आहे.
पाकच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव तहमीना जंजुआ यांनी पंतप्रधानांनी परराष्ट्र मंत्रालयावर केलेल्या टीकेमुळे आपण निराश झाल्याचे म्हटले आहे. इम्रान खान यांच्या टीकेतून परराष्ट्र सेवेबद्दल त्यांची समज कमी असल्याचे दिसून येते, असा टोलाही त्यांनी लगावला. माजी परराष्ट्र सचिव सलमान बशीर यांनी देखील परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांचा बचाव केला आहे.
पाक परराष्ट्र विभागाच्या कामाचे कौतुक करण्याची गरज असताना आपले पंतप्रधान त्यांच्यावर टीका करत असून, हे दुर्दैवी आहे. पंतप्रधानांनी भारतीय अधिकाऱ्यांची स्तुती केल्याने भारतीय प्रसारमाध्यमे अधिकच आनंदी आहेत, अशी नाराजी बशीर यांनी व्यक्त केली. इतरही अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इम्रान यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- तामिळनाडूतील महिलांना मोफत बस प्रवास, मुख्यमंत्री स्टॅलिन यांची घोषणा
- ‘सर्व राज्यांना मोफत लस द्या’, ममता बॅनर्जींची सुप्रीम कोर्टात याचिका
- ‘आंध्रप्रदेशच्या धर्तीवर कोरोनावर मोफत उपचार द्या’, शिवसेना नेत्याची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी
- ‘पीक कर्जास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करणार’, मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा
- महत्त्वाचे! ‘इएसआय’ सदस्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेऊन खर्च परत मिळणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

