चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारताच निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यावर भर दिला आहे. यापुढे राज्यात महिलांना मोफत बस प्रवास, कोरोना संकटात गरिबांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची आर्थिक मदत आणि दुधाचे दर कपात करण्याची लोकप्रिय घोषणा त्यांनी केली आहे.
तामिळनाडू सरकारने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संकट काळातील उपचारांना शासकीय विमा योजनेच्या कक्षेत आणण्यात आले आहे, ज्याचा लाखो लोकांना लाभ मिळणार आहे. कोरोना काळात रेशनकार्डधारकांना ४००० रुपये देणे व त्यांच्या उपजीविकेला मदत केली जाणार आहे.
या अंतर्गत पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी चालू मे महिन्यात कोरोनाग्रस्तांना २००० रुपयांची मदत जाहीर केली. त्यासाठी एकूण ४ हजार १५३ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यात २ कोटी रेशनकार्डधारकांना मदत मिळणार आहे. याचवेळी अविन दुधाची किंमत ३ रुपयांनी कपात केली आहे. येत्या १६ मेपासून हे आदेश लागू होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले. याबरोबरच निवडणूक आश्वासनांप्रमाणे राज्य परिवहन अर्थात बस सेवेत महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे. त्यासाठी अनुदान म्हणून १२०० कोटी रुपयांचा निधी वाटप केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सर्व राज्यांना मोफत लस द्या’, ममता बॅनर्जींची सुप्रीम कोर्टात याचिका
- ‘आंध्रप्रदेशच्या धर्तीवर कोरोनावर मोफत उपचार द्या’, शिवसेना नेत्याची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी
- ‘पीक कर्जास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करणार’, मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा
- महत्त्वाचे! ‘इएसआय’ सदस्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेऊन खर्च परत मिळणार
- आरक्षणप्रश्नी महाविकास आघाडी सरकारचे मोठे पाऊल, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

