बीड : मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा राष्ट्रपतीकडे बोट दाखवून वेळकाढूपणा करू नये, आरक्षणाचा विषय निष्क्रियपणे हाताळणाऱ्या अशोक चव्हाण यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसंग्रामचे अध्यक्ष आ.विनायक मेटे यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्याने आमदार विनायक मेटे यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. शुक्रवारी समाजाच्या तीव्र प्रतिक्रिया जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे पाठवल्या.
आ.मेटे म्हणाले की, आरक्षण रद्द केले झाल्याने मराठा समाजाच्या मुला-मुलींचे शैक्षणिक व प्रशासकीय भविष्य अंधकारमय झाले आहे. आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे समाजावर अन्याय झाला. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य प्रकारे बाजू मांडली नाही, मराठा समाजाचे आरक्षण कधीही गांभीर्याने घेतले नाही, सतत दुर्लक्ष केले, त्यामुळेच आरक्षण रद्द झाले आहे. मराठा समाजावर आघाडी सरकारने जो अन्याय केला. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन व संघर्ष करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान व राष्ट्रपतींकडे बोट दाखवून वेळकाढूपणा करण्याऐवजी स्वत: मुख्यमंत्री म्हणून मराठा समाजाला काय व कसा न्याय देणार, आरक्षण कसे देणार, सोयी सवलती काय देणार हे सांगावे, त्यानंतर मग काय पत्र प्रपंच करायचा तो करावा. अशोकराव चव्हाण यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. आमच्या मागण्यांचा विचार नाही केला तर आम्हाला संघर्षाशिवाय पर्याय राहणार नाही, असे निवेदनाद्वारे आ. मेटे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- भारतीय अधिकाऱ्यांचे कौतुक केल्याने पाकचे पंतप्रधान इम्रान खान अडचणीत
- तामिळनाडूतील महिलांना मोफत बस प्रवास, मुख्यमंत्री स्टॅलिन यांची घोषणा
- ‘सर्व राज्यांना मोफत लस द्या’, ममता बॅनर्जींची सुप्रीम कोर्टात याचिका
- ‘आंध्रप्रदेशच्या धर्तीवर कोरोनावर मोफत उपचार द्या’, शिवसेना नेत्याची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी
- ‘पीक कर्जास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करणार’, मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

