Share

खबरदार! मेडिकलमधून चॉकलेट, आईस्क्रिम विकल्यास होणार कारवाई

Published On: 

औरंगाबाद : गेल्या अनेक दिवसांपासून मेडिकलमधून औषधी साहित्यासह विविध प्रकारच्या उत्पादनांची विक्री होत आहे. त्यातच लॉकडाऊन काळात इतर दुकाने बंद आहेत. त्यामुळे २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी असणाऱ्या मेडिकलमध्ये चॉकलेट्स, कोल्ड्रिंक्स, आईस्क्रिम विक्री जोरात सुरू आहे. यामुळे मेडिकल चालकांची चांदी होत आहे. पण हे नियमबाह्य आहे. या गंभीर गोष्टीकडे इतक्या दिवस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. मात्र, औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष घातले आहे.

मेडिकल दुकानांमधून चॉकलेट, आईस्क्रिम विकले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. हे आता चालणार नाही. यापुढेही ब्रेक द चेन नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. आजवर औरंगाबादेत नियमांचे पालन न करणाऱ्या १७ आस्थापणांवर कारवाई केली असून ८९ गुन्हे दाखल करण्यात आलेत.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्यासह मनपाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. त्यावेळी विविध मुद्द्यांवरून त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जिल्हाधिकारी म्हणाले की, अनेक ठिकाणी नियमांचे काटेकोर पालन होत नाही. अनेक औषधांच्या दुकानांवर आईसक्रीम, चॉकलेट्स तसचे इतर साहित्य विकले जात आहे.

शहरात नागरिक अनेक ठिकाणी विनामास्क आणि विनाकारण फिरताना निदर्शनास येत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करा. प्रादेशिक परिवहन विभागाने पेट्रोल पंपावर पथक तैनात करून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी. राज्य उत्पादन विभागाने देखील मद्य विक्रेते नियमांचे पालन करत आहेत का हे गांभीर्यांने पाहावे. पोलिस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी मेडिकलवर शारीरिक अंतर पाळण्याचे नियम कडक करण्याचे निर्देश दिले. सकाळी ११ नंतर सुरू असणाऱ्या दुकानांवर कडक कारवाईचे संबंधितांना निर्देश दिले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!