🕒 1 min read
पुणे : गेल्या वर्षी मार्चमध्ये पुण्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली होती. यानंतर, शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस पुण्यातील दैनंदिन जनजीवन सुरळीत होत असतानाच या वर्षी पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने पुण्यासह राज्यात हाहाकार माजवला आहे.
कोरोना स्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने १ जून पर्यंत कडक निर्बंध वाढवले असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अनेक व्यापाऱ्यांच मोठं नुकसान होत असून चोथ्या व्यापाऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे, पुणे व्यापारी महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. दुकानांच्या वेळेवर निर्बंध लावा पण दुकानं उघडू द्या, अन्यथा १ जूननंतर दुकाने उघडू असा इशारा या पत्राद्वारे दिला आहे.
पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका म्हणाले, ‘दुकानं बंद करून ३१ मे ला ५६ दिवस होतील. याकाळात व्यापाऱ्यांनी पूर्णपणे सरकारला सहकार्य केलंय. या दिवसांमध्ये जवळपास ७५ हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. सरकारच्या महसुलात देखील घट झाली. व्यापाऱ्यांच प्रचंड नुकसान होत असून कर्मचाऱ्यांचे एप्रिल, मे चे ७० ते ८० टक्के पगार दिले. मात्र, तिसऱ्या महिन्याचा पगार देण्याची परिस्थिती व्यापाऱ्यांची नाहीये. यासोबतच, दुकाने बंद असल्याने अनेकांचे काम सुटले आहे. त्यामुळे बेरोजगारीत वाढ होत आहे, अशी व्यथा रांका यांनी मांडली आहे.
व्यापाऱ्यांसह कमर्चाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी देखील पुढाकार महासंघ घेत असून सीरमला अधिक लस पुरवण्याबाबत पत्र देखील लिहिलं आहे. एकीकडे दुकानं बंद होती मात्र ऍमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी ई-कॉमर्सचे निर्बंध तोडून अत्यावश्यक वस्तू वगळून इतर वस्तूंचा देखील पुरवठा केला. याबाबत आम्ही पोलिसांमध्ये तक्रार देखील दाखल केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आता विनंती आहे, त्यांनी दुकानं उघडण्यास परवानगी द्यावी, असं देखील रांका म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- पुणे सावरतंय ! आज नव्या कोरोनाबाधितांची संख्या पाचशेच्या आत
- मोदींच्या लेखी छत्रपती या उपाधीची किंमत केवळ निवडणुकीत वापरण्यासाठीच – काँग्रेस
- पत्रकार गिरीश कुबेरांचे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात ; अनेक संघटनांसह राजकीय पक्ष आक्रमक
- बाप रे! ब्लॅक आणि व्हाइट फंगसनंतर आता उत्तरप्रदेशात आढळला यल्लो फंगसचा रुग्ण
- नमस्कार, अजित पवार बोलतोय; दिव्यांग चित्रकाराचं अजितदादांनी केलं फोनवरून कौतुक !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

